न्यूयॉर्क : आपल्या घरातील चीजवस्तू स्वच्छ, नीटनेटक्या असाव्यात, यावर सर्वांचाच भर असतो. मात्र, वरून जितक्या त्या ठीकठाक दिसतात, तितक्या आतून असतात का, हे देखील तितकेच महत्त्वाचे. कोणतीही व्यक्ती असो. त्याची विश्रांती केव्हाही झोपी गेल्यानंतरच पूर्ण होती. दिवसभरातील थकवा कमी करण्यासाठी उत्तम झोप तितकीच महत्वाची असते.पण, अगदी आपण जी उशी वापरतो, त्याचे कव्हरही ( Pillow cover ) वेळोवेळी निर्जंतुक करणे आवश्यक असते आणि नेमके याकडेच आपले लक्ष असत नाही, असे दिसून येते.
शँटेल मिला या क्लिनिंग एक्स्पर्टनुसार, उशीचे कव्हर सातत्याने बदलणे व त्याची स्वच्छता राखणे तितकेच महत्त्वाचे असते. आपल्या तब्येतीसाठी व आपल्या त्वचेसाठी देखील याकडे पुरसे लक्ष पुरवणे गरजेचे असते. आपला घाम व तेल या उशा शोषून घेत असतात. त्यामुळे, अॅलर्जी व ब—ेकआऊटची शक्यता वाढते. त्यामुळे, इन्फेक्शन होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेणे गरजेचे असते.
शँटेल मिला म्हणतात की, उशांचे कव्हर किमान 3 ते 4 दिवसातून एकदा धुतलेच पाहिजेत. लिक्विड डिटर्जंट आणि युकेलिप्टस तेलाचा यासाठी वापर करता येईल. मात्र, फॅबि—क सॉफ्टनर वापरू नये. यापूर्वी, एका अभ्यासात असे म्हटले गेले होते की, आपला चेहरा व आपले केस उशीवर असतात आणि घाम व डेड स्कीन सेल्स चिकटतात. अशा परिस्थितीत 4 आठवडे स्वच्छ न केलेल्या उशांच्या कव्हरमध्ये 12 दशलक्ष बॅक्टेरिया असतात. याचप्रमाणे एका आठवड्यापासून वापरात असलेल्या कव्हरमध्ये 50 लाख बॅक्टेरिया असतात. त्यामुळे ते वेळोवेळी स्वच्छ करणे अतिशय महत्त्वाचे असते, असे अभ्यासकांचे मत आहे.
हेही वाचा :