केरळच्या पुथुप्पल्ली विधानसभा मतदारसंघात जल्‍लाेष करताना काँग्रेस कार्यकर्ते. 
Latest

Bypoll Results 2023 : पोटनिवडणुकीत ‘इंडिया’चा चाैकार, भाजपची तीन ठिकाणी बाजी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सहा राज्‍यांमधील सात विधानसभा मतदारसंघांमध्‍ये झालेल्‍या पोटनिवडणुकीत भाजपविराेधी 'इंडिया' आघाडीतील मित्र पक्षांनी चार ठिकाणी विजय मिळवला आहे. तर भाजपने  त्रिपुरा आणि उत्तराखंड राज्‍यांमधील तीन मतदारसंघांमध्‍ये बाजी मारली आहे.

राज्‍यनिहाय विधानसभा पाेटनिवडणूक, कंसात मतदारसंघ  : उत्तराखंड (बागेश्वर), उत्तर प्रदेश (घोसी), केरळ ( पुथुप्पल्ली ), पश्चिम बंगाल ( धुपगुरी ), झारखंड (डुमरी) आणि त्रिपुरातील (बॉक्सनगर, धानपूर आणि बागेश्वर). यातील धुपगुरी आणि धानपूर हे मतदारसंघ  पाेटनिवडणुकीपूर्वी भाजपकडे होते, तर घोसी सपाकडे,  बॉक्सानगर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), डुमरी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि पुथुपल्ली मतदारसंघ काँग्रेसकडे हाेते.

केरळमध्‍ये काँग्रेसचा माेठा विजय, झारखंडमध्‍ये 'जेएमएम'च

केरळमधील पुथुप्पल्ली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला. केरळचे माजी मुख्‍यमंत्री ओमन चंडी यांचे पूत्र चंडी ओमन यांनी पुथुप्पल्लीमध्‍ये विजय मिळवला. त्‍यांनी सत्ताधारी सीपीआय(एम) चे उमेदवार जैक सी थॉमस यांचा 36,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. जुलैमध्ये ओमन चंडी यांच्या निधनानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. झारखंडमधील डुमरी पोटनिवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाच्या बेबी देवी 17,000 मतांच्या फरकाने विजयी झाल्या त्‍यांनी AJSU च्या यशोदा देवी यांचा पराभव केला.

त्रिपुरा, उत्तराखंडमध्‍ये भाजपला दिलासादायक यश

त्रिपुरातील बॉक्सानगर आणि धानपूर विधानसभा पोटनिवडणुकीत कारण तफज्जल हुसेन आणि बिंदू देबनाथ हे उमेदवार अनुक्रमे 30,237 आणि 18,871 मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाले. उतराखंडच्‍या बागेश्वर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या पार्वती दास २४०५ मतांनी विजय झाल्‍या.  माजी कॅबिनेट मंत्री चंदन रामदास यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक जाहीर झाली होती. भाजपने चंदन रामदास यांच्या पत्नी पार्वती दास यांना उमेदवारी दिली होती.

प. बंगालमध्‍ये तृणमूलचा भाजपला धक्‍का

ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने धुपगुरीची जागा भाजपकडून हिसकावून घेतली आहे. भाजपचे आमदार बिष्णू पदा रे यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक झाली. सलग दाेन विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपने बाजी मारली हाेती. मात्र पाेटनिवडणुकीत तृणमूलच्‍या निर्मल चंद्र रॉय यांना भाजपच्या तापसी रॉय यांच्यावर ४,००० मतांनी विजय मिळवला.

युपीतील 'घाेसी'चा गड सपाने राखला

उत्तर प्रदेशातील घोसी विधानसभा पोटनिवडणुकीत आज झालेल्या सतराव्या फेरीच्या मतमोजणीनंतर समाजवादी पक्षाचे उमेदवार सुधाकर सिंह यांनी भाजपचे प्रतिस्पर्धी दारा सिंह चौहान यांच्यावर 22,923 मतांच्या फरकाने निर्णायक आघाडी घेतली हाेती. अधिकृत विजयाच्‍या घाोषणे आधी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्‍लोष सुरु केला हाेता. अखेर सुधाकर सिंह यांनी ४२,७५९ मतांनी विजय नाेंदवला.

— ANI Digital (@ani_digital) September 8, 2023

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT