रामनगरी अयोध्येला थेट देशाची राजधानी दिल्ली सोबत जोडण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. (Bullet Train Delhi Ayodhya ) दिल्ली ते वाराणसी दरम्यान बुलेट ट्रेन चालवण्यासंबंधीच्या योजनेवर केंद्र प्रयत्नरत आहे. ही ट्रेन अयोध्यामार्गे वाराणसीला पोहचेल. बुलेट ट्रेनमुळे दिल्ली ते अयोध्या या दोन्ही शहरांमधील प्रवास अवघ्या तीन तासांमध्ये पूर्ण केला जावू शकतो.
सध्यस्थितीत अयोध्या ते दिल्ली दरम्यान ६७० किलोमीटर चे अंतर कापण्यासाठी १० ते १२ तास लागतात. पंरतु, सरकारच्या नवीन योजनेमुळे रामनगरी आता थेट राजधानी सोबत जोडली जाईल. प्राप्त माहितीनूसार ८६५ किलोमीटरच्या या हाय स्पीड रेल्वे नेटवर्कने अनेक शहरे जोडली जातील. यात लखनऊ, अयोध्या, मथुरा, इटावा, कन्नोज, प्रयोगराज सह १२ स्टेशन राहतील. अयोध्येला लखनऊ सोबत जोडण्यासाठी १३० किलोमीटर लांब रेल्वे ट्रॅक टाकण्यात येणार आहे.
यामुळे दिल्ली-लखनऊ दरम्यानचा प्रवास केवळ १ तास ३८ मिनिटांवर येईल. बुलेट ट्रेनच्या नेटवर्क सोबत अनेक धार्मिक शहरे जोडली जातील. योजनेच्या प्रस्तावित रेल्वे मार्गावर रियल इस्टेट क्षेत्राला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ३५० किलोमीटर ताशी वेगाने चालणाऱ्या या ट्रेनची प्रवासी क्षमता जवळपास ७५० राहील, अशी माहिती समोर आली आहे.
ट्रेनचा कमाल वेग ३५० किलोमीटर ताशी राहील. तसेच संचालन गतीचा वेग ३०० किलोमीटर ताशी राहील.ट्रेनमध्ये भूकंपाची माहिती तात्काळ मिळण्याची यंत्रणा कार्यान्वित राहील. ट्रेनमध्ये अलार्म सह ऑटोमॅटिक ब्रेक ची यंत्रणा देखील राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लान (एनएमपी) नूसार योजनेला संपूर्ण मार्गात नॅशनल मल्टी-मोडल परिवहन कनेक्टिव्हिटी सोबत एकीकृत केले जाईल. दिल्लीत मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशन तसेच आंतरराज्यीय बस टर्मिनल सोबत फुट ओव्हरब्रीजच्या (एफओबी) माध्यमातून स्टेशन पार्किंग सुविधेचा प्रस्ताव आहे.
देशात अजून एक बुलेट ट्रेन चालवण्याची योजना बनवली जात असताना देशाची पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावण्यासाठी सज्ज आहे. प्राप्त माहितीनूसार गुजरात मधील सुरत ते बिलीमोरा दरम्यान ही बुलेट ट्रेन लवकरच सुरू केली जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही स्थानकांदरम्यान ५० किलोमीटरचे अंतर अवघ्या १५ मिनिटांमध्ये पूर्ण केले जाईल.