Crime 
Latest

Pune Crime News : धक्कादायक! बेकायदा पिस्तूल आणलं; मित्राला दाखवायला गेला अन् झालं असं…

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बेकायदा खरेदी केलेले पिस्तूल हाताळताना गोळी सुटून तरुण जखमी झाल्याची घटना खडकवासलातील सांगरुण गावात घडली. अभय छगन वाईकर (वय 22) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अविष्कार ऊर्फ मोन्या तुकाराम धनवडे (वय 19, रा. सांगरुण, ता. हवेली) याला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिस हवालदार आनंद घोलप यांनी उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाईकर आणि धनवडे मित्र आहेत. दोघे खडकवासला परिसरातील सांगरुण गावात राहायला आहेत.

वाईकरने बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल खरेदी केले होते. तो धनवडे याला ते पिस्तूल दाखवित होता. पिस्तूल हाताळताना धनवडे याच्याकडून पिस्तुलाचा चाप ओढला गेला. पिस्तुलातून सुटलेली गोळी वाईकरच्या मानेला चाटून गेली. यात वाईकर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने एरंडवणे भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

पिस्तुलाची बिहारमधून खरेदी

वाईकर याने बिहारमधून देशी बनावटीचे पिस्तूल आणले होते. त्याने पिस्तूल का बाळगले, यादृष्टीने तपास सुरू आहे. त्याने कोणाकडून पिस्तूल खरेदी केले, याची माहिती घेण्यात येत असल्याचे उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण बालवडकर यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT