पुणे; पुढारी वृत्तसेवा : डेक्कन परिसरातील गोखले (गुडलक) चौकातील कलाकार कट्ट्यासमोर अतिक्रमण करून लावण्यात आलेले प्रदर्शन महापालिका प्रशासनाने हटविले. कलाकार कट्ट्यावर अतिक्रमण करून एका कंपनीने शनिवारी दुचाकींसह प्रदर्शन थाटल्याचे दै. 'पुढारी'ने महापालिका अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. वरिष्ठ अधिकार्यांनी याबाबत क्षेत्रीय कार्यालय आणि परिमंडळ उपायुक्तांना तपासणी करण्याचा आदेश दिला.
वरिष्ठांच्या आदेशानुसार घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षक शशिकांत टाक, कर्मचारी वैभव जगताप आणि ज्ञानेश्वर कोल्हमकर यांनी तात्काळ कारवाई करून अतिक्रमण हटविले. यासंदर्भात टाक म्हणाले, 'संबंधित कंपनीकडे वाहतूक पोलिसांची एनओसी होती. तसेच त्यांनी परवानगीसाठी महापालिकेकडेही अर्ज केला होता. मात्र, महापालिकेची परवानगी मिळण्यापूर्वीच त्यांनी प्रदर्शन लावले होते. त्यामुळे तक्रार आल्याबरोबर ते हटविण्यात आले.
हेही वाचा