संग्रहित छायाचित्र 
Latest

लव्ह, प्यार और धोका…लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराकडून प्रेयसीचे लैंगिक शोषण

backup backup

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवलीत सामूहिक अत्याचाराचे प्रकरण गाजत असतानाच लव्ह, प्यार और धोका या हिंदी चित्रपटाच्या कथानकासारखी एक घटना समोर आली आहे. एका 21 वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याच्या बहाण्याने 24 वर्षीय  प्रियकराने 7 महिने तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीचे लैंगिक शोषण प्रकरणी  पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात दगाबाजावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. शिवाजी फड (24) असे अटक केलेल्या कथित प्रियकराचे नाव आहे.

पीडित तरुणी कल्याण पूर्वेत राहणारी असून ती एका खासगी कंपनीत नोकरी करते. तर आरोपी शिवाजी हा कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात राहतो. या दोघांची फेब्रुवारीमध्ये ओळख झाली. याच ओळखीचा फायदा घेत आरोपीने पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने या तरुणीसमोर संसाराच्या आणाभाका गायल्या.

त्यांनतर लग्नाचे आमिष दाखवले. फेब्रुवारी ते सप्टेंबर दरम्यानच्या 7 महिन्यांत डोंबिवलीतील एका लॉजमध्ये वारंवार नेऊन या तरुणाने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र लग्न करण्यास नकार दिल्याने आपली फसगत झाल्याची या तरुणीला खात्री पटली. त्यामुळे तिने या दगाबाजाला धडा शिकवण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर बेतलेल्या प्रसंगांचे कथन केले. प्रेयसीचे लैंगिक शोषण झाल्याची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या तरुणीच्या जबानीवरून कथित प्रियकराच्या विरोधात भादंवि कलम 376, 376 (2) (एन), 417 अनव्ये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या कथित प्रियकराला अटक करण्यात आली. कल्याण कोर्टाने आरोपी शिवाजी फड याला अधिक चौकशीकरिता पोलिस  कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT