Latest

लगीन घाई! परिणीती-राघव याचं लंडनमध्ये कॉलेज प्रेम बहरलं! पाहा काय आहे प्रकरण…

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बॉलिवूड स्टार परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा (Parineeti Chopra Raghav Chadha ) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोन्ही स्टार्सने ग्रँड सेलिब्रेशनमध्ये एंगेजमेंट केली आहे. मे महिन्यात दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये या दोघांची एंगेजमेंट मोठ्या धूमधडाक्यात पार पडली. आता हे दोघे एकमेकांशी लग्न करण्याच्या तयारी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांच्या लग्नाची तारीखही निश्चित झाली आहे. एका रिपोर्ट्सनुसार, फिल्म स्टार परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा (Parineeti Chopra Raghav Chadha ) 25 सप्टेंबरला लग्न शाही पद्धतीने लग्न करणार आहेत.

परिणीती आणि राघव चढ्ढा हे पहिल्‍यांदा लंडनमध्ये भेटले

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे लग्न २५ सप्टेंबरला होणार आहे. दोघांच्या लग्नाची तयारीही कुटुंबीयांनी सुरू केली आहे. दोघेही डेस्टिनेशन वेडिंगद्वारे राजस्थानमध्ये लग्न करणार आहेत. याबाबत अधिक माहिती देताना एका कुटुंबीयांनी सांगितले की, 'ही एक भव्य, शाही लग्न असेल. लग्नाची सर्व तयारी कुटुंबीय करणार आहेत. तर आता त्यांच्या टीमने लग्नाच्या तयारीचे कामे सुरू केली आहेत.
परिणीती आणि राघव चढ्ढा हे पहिल्‍यांदा लंडनमध्ये भेटले होते. सुरूवातीला मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर थेट प्रेमात झाले. अनेक वर्षे परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी एकमेकांना डेट केले. यानंतर त्‍यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

साखरपुड्याच्या अगोदर बऱ्याच वेळा परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना मुंबईमध्ये स्पाॅट केले गेले होते. साखरपुड्याच्या अगोदरच कधीच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे त्यांच्या नात्याबद्दल भाष्य करताना दिसले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून चाहते हे परिणीती चोप्रा आणि राघव यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

-हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT