आर्यन खानच्या कोठडीत वाढ  
Latest

Drugs : या कारणावरुन या बॉलिवुड सेलिब्रिटींना तुरुंगाची हवा खावी लागली

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) बॉलिवुडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतल आहे. क्रूझ जहाजावर एक रेव्ह पार्टी चालू होती आणि एनसीबीने टाकलेल्या छाप्यात ड्रग्ज (Drugs) देखील सापडले आहेत.

एनसीबीने आता आर्यनसह अन्य सात जणांना अटक करण्याची तयारी करत आहे. बॉलिवुड सेलिब्रिटींना ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी अटक होण्याची ही पहिलीच घटना नाही. या अगोदरही सेलिब्रिटींना ड्रग्समुळे जेलची हवा खावी लागली आहे.

सुरुवात झाली होती संजय दत्त पासून

संजय दत्त

संजय दत्त हा ड्रग्ज ॲडिक्ट झाला होता. संजय दत्तला १९८२ मध्ये ड्रग्ज (Drugs बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. संजय दत्तलाही न्यायालयाने ५ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर सुनील दत्तने संजय दत्तला ५ महिन्यांसाठी अमेरिकेच्या व्यसनमुक्त केंद्रात पाठवले होते.

फरदीन खान

बॉलिवुड अभिनेता फिरोज खानचा मुलगा फरदीन खान त्याच्या चित्रपटांमुळे कधीही प्रसिद्धीच्या झोतात आला नव्हता. पण ड्रग्जच्या (Drugs)  संबंधात त्याचे नाव पुढे आले होते. फरदीन खान जवळ कोकेन सापडले, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

विजय राज

बॉलिवुड अभिनेता विजय राज हा २००५ मध्ये त्याच्या 'दीवाने हुआ पागल' या चित्रपटाच्या शुटिंगसाठी दुबईला गेला होता. तो परतत असताना विमानतळावर त्याच्या हँडबॅगमध्ये ५ ग्रॅम गांजा सापडला. यानंतर विजय राजला अटक करण्यात आली आणि त्याच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आली. मात्र, त्याची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्याला एका दिवसानंतर सोडून देण्यात आले.

रिया चक्रवर्ती

सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर तपासात ड्रग्ज (Drugs) चे प्रकरण समोर आले होते. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकने सुशांतसाठी गांजा खरेदी केल्याचे तपासात उघड झाले. यानंतर, एनसीबीने रिया चक्रवर्तीला ८ सप्टेंबर २०२० रोजी अटक केली. रिया चक्रवर्ती या प्रकरणात एक महिना मुंबईच्या भायखळा कारागृहात होती.

अरमान कोहलीच्या घरी ड्रग्ज मिळाले होते.

बॉलिवुड अभिनेता अरमान कोहलीच्या घरात एनसीबीला कोकेन सापडले होते. यानंतर एनसीबीने अरमान कोहलीला नशेच्या अवस्थेत असताना अटक केली होती.

भारती सिंह-हर्ष लिंबाचिया यांच्याजवळ गांजा सापडला होता.

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्याजवळ ६५ ग्रॅम गांजा सापडला होता. भारती आणि हर्ष या दोघांनी एनसीबीच्या चौकशीत कबूल केले होते की दोघांनी गांजाचे सेवन केले होते.

एजाज खान

'बिग बॉस' मधील प्रसिद्ध अभिनेता एजाज खान याच्या फ्लॅटवर छापा टाकून ड्रग्ज जप्त करण्यात आली होती. चौकशीनंतर एजाज खान ला एनसीबीने अटक केली.

गौरव दीक्षित

अभिनेता गौरव दीक्षितच्या घरावर टाकलेल्या छाप्यात एनसीबीला चरस सापडले होते. यानंतर गौरव दीक्षितला एनसीबीने २८ ऑगस्ट रोजी अटक केली. २४ सप्टेंबर रोजी गौरव दीक्षितची जामिनावर सुटका झाली.

प्रीतिका चौहान

'सावधान इंडिया' सारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसलेल्या अभिनेत्री प्रीतिका चौहानला औषधे खरेदी करताना एनसीबीने रंगेहाथ अटक केली. प्रीतिका चौहानची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.

हेही वाचलत का :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT