मुंबई रेव्ह पार्टी : 'एनसीबी'च्या रेडनंतर सुनील शेट्टीची पहिली प्रतिक्रिया - पुढारी

मुंबई रेव्ह पार्टी : 'एनसीबी'च्या रेडनंतर सुनील शेट्टीची पहिली प्रतिक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई रेव्ह पार्टी सुरू असताना शनिवार अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईत छापा टाकला. त्यात ८ जणांना अटक केली. या छाप्यामध्ये बाॅलिवुड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश आहे. यावर अभिनेता सुनिल शेट्टीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुनिल शेट्टीने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

त्यात तो म्हणतो की, “जेव्हा एखाद्या जागी धाड टाकण्यात येते. तेव्हा बरेच लोक असतात. म्हणून आम्हीही असे गृहीत धरतो की, या मुलाने ड्रग्ज घेतले, या मुलाने हे केले. मला वाटते की, प्रक्रिया सुरू आहे, म्हणून ती तशीच ठेवा आणि त्या मुलाला श्वास घेण्यास वेळ द्या. जेव्हा बाॅलिवुडमध्ये काही घडते, तेव्हा मीडिया लगेचच तुटून पडते”, असेही ताे म्‍हणाला.

सुनील पुढे म्हणतो की, “प्रत्येकाला वाटते की, हा देखील असाच असेल. त्या मुलाला एक संधी द्या आणि खरा अहवाल बाहेर येण्यासाठी वेळ द्या. अजून लहान आहे, तोपर्यंत त्याची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे”, असे मत सुनील शेट्टीने मांडले.

सुनीलच्या या मतावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

एनसीबीने मुंबईजवळीत काॅर्डेलिया द इम्प्रेस या क्रूझवर टाकलेल्या छाप्यात अनेक जणांना अटक केलेली आहे.

या वेळी  ६०० लोक उपस्थित होते.

याप्रकरणी आरसीन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जस्वाल, विक्रांत छोकक आणि गोमित चोप्रा यांना अटक करण्यात आली आहे. यामध्‍ये  तीन मुलींचाही समावेश आहे.

पहा व्हिडीओ : धनंजय माने पुन्हा आले : अशोक मामांचे फेमस डायलॉग ‘अशी ही बनवा बनवी’ ला 33 वर्ष पूर्ण!

Back to top button