Tiger 3 
Latest

Tiger 3 : सलमान- कॅटरिना कैफच्या ‘टायगर ३’ गाण्याची पहिली झलक

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता सलमान खान यांच्या 'टायगर ३' ( Tiger 3 ) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान कॅटरिना आणि सलमानच्या एक- एक करून चित्रपटातील झलक समोर येत आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. आता या चित्रपटातील गाण्याची पहिली झलक सोशल मीडियावर पाहायला मिळाली आहे. यामुळे चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संबंधित बातम्या

अभिनेत्री कॅटरीना कैफने तिच्या इन्स्टाग्रामवर आगामी टायगर ३' ( Tiger 3 ) चित्रपटातील "लेके प्रभू का नाम" या गाण्याच पोस्टर शेयर केलं आहे. या पोस्टरमध्ये कॅटरिना आणि सलमान डान्स करताना दिसत आहेत. यावेळी कॅटनं स्टायलिश रेड- व्हाईट कलरचा ड्रेसमध्ये तर सलमानने ब्लॅक रंगाची शर्ट- पॅन्ट परिधान केली आहे. फोटोत दोघेजण खूपच ग्लॅमरस दिसत आहेत.

Tiger 3

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने "#Tiger3 Party track loading!, आमच्या पहिल्या गाण्याची पहिली झलक ? #LekePrabhuKaNaam, गाणे २३ ऑक्टोबर रोजी येणार आहे. तर या दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये #Tiger3, १२ नोव्हेंबर २०२३ ला चित्रपट भेटीस येणार आहे. असे लिहिले आहे.

या झलकमध्ये कॅटरिना कैफ लाल पंखांच्या पोशाखात सलमान खानसोबत पोज देताना दिसत आहे. 'टायगर ३' हा 'टायगर' फ्रँचायझीमधील तिसरा अध्याय पार्ट आहे. ज्यामध्ये कॅटरिना कैफ सलमान खानसोबत भूमिका साकारत आहे. तर इमरान हाश्मी खलनायकाची भूमिका साकारत आहे. मनीश शर्मा दिग्दर्शित 'टायगर ३' हा चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. कॅटरिना, सलमान याच्या आगामी 'टायगर ३' चित्रपटासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT