Alia Bhatt 
Latest

Alia Bhatt : IOC च्या उद्घाटन समारंभात चक्क आलिया भट्ट डाराडून झोपली तर रणबीर…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : १४१ व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा (IOC) उद्घाटन समारंभ नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात अनेक दिग्गज बॉलिवूड स्टार्संनी हजेरी लावली. या सत्रात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ( Alia Bhatt ) यांची आवर्जून उपस्थिती पाहायला मिळाली. मात्र, या कार्यक्रमात चक्क बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट डाराडून झोपताना दिसली. हा तिचा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

संबधित बातम्या 

व्हायरल झालेल्या फोटोत अभिनेता शाहरुख खान, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ( Alia Bhatt )  हे चार स्टार्स IOC च्या संभारंभात खुर्चीवर बसलेले दिसतात. 'जवान' मधील फेमस कपल शाहरुख आणि दीपिका समोरच्या रांगेत बसले आहे. तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्याच्या मागील रांगेत बसले आहेत. दोन्ही कपलना एक साथ पाहिल्याने चाहत्यांचा उत्साह वाढला आहे.

तर दुसरीकडे मात्र, आलिया पती रणबीर कपूरच्या खांद्यावर डोके ठेवून डाराडून झोपलेली दिसतेय. तर रणबीर त्याच्या फोनमध्ये पाहत बिझी आहे. या कार्यक्रमासाठी आलियाने ब्ल्यू कलरचा ड्रेस निवडलाय. तर र‍णबीर ब्ल्यू कलरच्या शूटमध्ये हॅडसम दिसतोय. यावरून हे कपल त्याच्याच नादात असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

हा फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी शाहरूख, दीपिकाचे भरभरून कौतुकाचा वर्षाव केले आहे. तर काही युजर्सनी आलिया आणि रणबीरच्या या वागण्यावर अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. 'सगळ्यांना कंटाळा आलाय', 'आलियाला खरंच डाराडून झोपली आहे'. 'यात तिचा काही दोष नाही कारण, कार्यक्रम कदाचित बोरिंग असेल', 'जणू तिला जगात काय चालले आहे याची पर्वा नाही'. 'रणबीर त्याच्या फोनमध्ये बिझी असून तो खरा बॅकबेंचरसारखा दिसतोय.' या सारख्या अनेक कॉमेन्टस नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा : 

(video : viralbhayani instagram वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT