पुढारी ऑनलाईन डेस्क ; बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या आगामी 'राम सेतू' (Ram Setu ) चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा नुकताच सोशल मीडियावर धमाकेदार ट्रेलर (Ram Setu Trailer) रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज होताच चाहत्यांकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळताना दिसत आहे.
अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या इन्स्टाग्रामवर आगामी 'राम सेतू' चित्रपटाचा २ मिनिटे १० सेंकदाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. यात धमाकेदार ट्रेलरमध्ये पहिल्यांदा एक आलिशान कार आणि त्याच्या सभोवती लोकाची गर्दी दाखविण्यात आली आहे. यासोबत समुद्राच्या पाण्यात जहाज आणि आकाशात फिरणारे हेलिकॉप्टर दिसतेय. याच दरम्यान सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे राम सेतू पाडण्यासाठी परवानगी मागितल्याचे दिसतेय. याला आव्हान देण्यासाठी अक्षय कुमारची निवड केली जाते.
यानंतर जगभरात रामाची मंदिर अनेक आहेत. परंतु, राम सेतू एकच आहे. तो तोडता येणार नाही. हा राम सेतू वाचवण्याचे आवाहन अक्षय कुमार पेलणार आहे. यात तो ७००० वर्षापूर्वीचा राम सेतू शोधण्यासाठी अक्षय प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतोय. शेवटी खोल समुद्राच्या पाण्यातून राेबाेटच्या माध्यमातून राम सेतू शोधतो. पुरावा म्हणून त्यातील एक रामाचा दगड समुद्राच्या पाण्यातून बाहेर घेवून आल्याचे दाखविले आहे. यावेळी खास करून अक्षय पाण्यावरून चालताना दिसला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या पंसतीस उतरला आहे. यात एका युजर्सने कौतुक करताना 'सर्वात उत्कृष्ट', 'ब्लॉकबस्टर' असे म्हटलं आहे.
याआधी, अक्षय कुमारने आगामी राम सेतू चित्रपटाची एक झलक शेअर केली होती. यात तो लांब केस आणि पांढरी दाढी आणि खांद्यावर एक पिशवी घेवून पळताना दिसला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत बॉलिवूड जॅकलिन फर्नांडिस, नुसरत भरुचा आणि सत्य देव हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २५ ऑक्टोबर २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
हेही वाचलंत का?