Latest

धुळे महापालिका महापौर पदी भाजपचे प्रदीप कर्पे यांची निवड

backup backup

धुळे, पुढारी वृत्तसेवा: धुळे महापालिका नवव्या महापौर पदी भाजपाच्या प्रदीप कर्पे यांची निवड झाली. त्यांनी आघाडीच्या उमेदवाराचा १७ विरुद्ध ५० असा दणदणीत पराभव केला. या निवड प्रक्रियेत शिवसेना व बसपा तटस्थ राहिले. एमआयएम ला ४ मते मिळाली.

धुळे महानगरपालिका निवडणुकीत २०१८ मध्ये भाजपने ७४ पैकी ५० जागा भाजपने मिळवत बहुमत मिळवले.तर राष्ट्रवादीला ८, काँग्रेसला ६, एमआयएम ला ४ , सपाला २,शिवसेनेचे १, बसपा , लोकसंग्राम, व अपक्ष यांचे प्रत्येकी १ , जागा मिळाली.

यातून लोकसंग्रामच्या हेमाताई अनिल गोटे यांनी राजीनामा दिला. मनपाच्या पहिल्या अडीच वर्षासाठी भाजपचे चंद्रकांत सोनार यांना संधी मिळाली.

त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर धुळे महापालिका महापौर निवडीचा कार्यक्रम लागला.

त्यासाठी आज जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयुक्त टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ यांच्या उपस्थितीत विशेष सभा झाली.

निवडीसाठी ऑनलाईन मतदान घेण्यात आले. तत्पुर्वी शिवसेनेच्या ज्योत्स्ना पाटील व अपक्ष अन्सारी यांनी उमेदवारी मागे घेतली.

तर निवडणुकीत ज्योत्स्ना पाटील, बसपाच्या सुशिला ईशी या तटस्थ राहिल्या. भाजपचे प्रदीप कर्पे यांना ५० मते मिळाली.

एमआयएमच्या सईदा इकबाल अन्सारी यांना ४, आघाडीच्या मदिना समशेर पिंजारी यांना १७ मते मिळाली.

त्यानंतर प्रतिक्रिया देतांना नवनियुक्त महापौर प्रदीप कर्पे यांनी सहकारी नगरसेवक तसेच पक्षाचे नेते व पदाधिकारी यांचे आभार मानले.

शहर डेंगू व साथीच्या आजाराने ग्रस्थ आहे. हा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार आहे.

अनेक प्रलंबित कामे मार्गी लावणार असून रस्ते दुरुस्ती करून शहर खडेमुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT