पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी क्रिकेटपटू भाजप खासदार गौतम गंभीर याला पुन्हा जीवे मारण्याची धमकी देणारा ई-मेल आला आहे. २८ नोव्हेंबर रोजी रात्री गौतम गंभीरला एक ई-मेल आला. सुरक्षेसाठी असेलेले पोलीस काहीही करु शकणार नाहीत, असेही यामध्ये म्हटलं आहे.
isiskashmir@yahoo.com या ई-मेल आयडीवरुन हा मेल आला आहे. दिल्ली पोलीस आणि आयपीएस श्वेता काही करु शकणार नाहीत. अस या ई-मेल मध्ये म्हटलं आहे. आमचे गुप्तहेर पोलीसमध्ये आहेत. ते आम्हाला सर्व माहिती देत आहेत, असेही यात म्हटलं आहे. ई-मेल मध्ये आयपीएस श्वेता यांचा नाव आहे. त्या सेंट्रल डिस्ट्रीक्टच्या डीसीपी आहेत. गौतम गंभीरला या अगोदर काही दिवसांपूर्वीच ई-मेल वरुन धमकीचा संदेश आला होता. हा मेल इसिस कश्मीर या दहशतवादी संघटनेने केला होता. यानंतर गौतम गंभीरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सायबर सेल करत आहे. हा ई-मेल पाकिस्तानच्या कराची येथून आल्याचं म्हटलं जात आहे.
इसिस काश्मीरकडून दूरध्वनीद्वारे तसेच ई-मेलच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे गंभीर याने तक्रार दिली होती. दिल्लीकर असलेले गंभीर दोनवेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य होते. दिल्ली पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे.