Latest

India vs Scotland : भारताचा स्कॉटलंडवर दणदणीत विजय

अमृता चौगुले

India vs Scotland स्कॉटलंडने ठेवलेले ८५ धावांचे आव्हान भारताने अवघ्या ४० चेंडूत पार केले. न्यूझीलंड पेक्षा चांगला रनरेट करण्यासाठी भारताला हा सामना ४३ जिंकणे आवश्यक होते. अगदी तशा पद्धतीने आक्रमक फलंदाजी करत भारताने हा सामना २ गड्यांच्या मोबदल्यात ६. ३ षटकात म्हणजे ३९ चेंडूत जिंकूण रनरेट वाढवला आहे. आता न्यूझीलंडचा रनरेट प्लस १.२७७ आहे. तर भारताने आपला रनरेट १.६१९ इतका केला आहे. या विजयानंतर सेमीफायनल मध्ये पोहचण्याच्या आशा आणखी पल्लवीत झाल्या आहेत. आत फक्त अफगानिस्तानवर साऱ्या भारतीयांच्या नजरा असणार आहेत कारण, अफगानिस्तानने न्यूझीलंडला मात दिली तर भारत सेमीफायनल मध्ये पाहचू शकतो.

भारतापुढे स्कॉटलंडने ८५ धावांचे आव्हान दिले होते. रनरेटसाठी हे आव्हान ४३ चेंडूत पार करणे आवश्यक होते. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहूल यांनी आक्रमक आणि धडाकेबाज फलंदाजीचा नमुना पेश केला. पहिल्या षटकापासून त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. सामोर येईल त्या गोलंदाजाचा चेंडू फक्त सिमापार पोहचवणे इतकेच लक्ष दोन्ही सलामीवीरांनी ठेवले होते. पहिल्या षटकात ८ धावा केल्या. दुसऱ्या षटकात २३ धावा, तिसऱ्या षटकात १६, चौथ्या षटकात १४ धावा करत पहिल्या ४ षटकात संघाच्या ५० धावा पूर्ण केल्या. यानंतर ५ व्या षटकात १७ धावा घेतल्या. पण पाचव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रोहित शर्मा यॉर्कर चेंडूवर पायचित झाला. त्याला वीटने बाद केले. पण स्फोटक फलंदाजी करताना रोहितने अवघ्या १६ चेंडूत ३० धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार ठोकला.

पाच षटकानंतर भारताने १ बाद ७० अशा स्थिती पोहचला होता. सहाव्या षटकात राहूलने आपली फटकेबाजी चालूच ठेवली. दरम्यान सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर राहूल ने आपले अर्धशतक पूर्ण केले. केएल राहूल याने अवघ्या १८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, याच षटकातील शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारायला जाऊन राहूल झेल बाद झाला. पण आपल्या धडाकेबाज फलंदाजीत त्याने १९ चेंडूत ५० धावा केल्या. या खेळीत त्याने ६ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी केली. यानंतर आलेल्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. सूर्यकुमारने सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सरळ साईट स्क्रीनवर षटकार मारत थाटात विजय मिळवला. भारताने या धावा ३९ चेंडूत पूर्ण करत आपला रनरेट न्यूझीलंडच्या पुढे नेला आहे. या विजया बरोबर भारतीय संघाने आपल्या कर्णधाराला बर्थ डे गिफ्ट दिले आहे.

तत्पुर्वी, India vs Scotland  स्कॉटलंड विरुद्ध भारताच्या गोलंदाजी समोर स्कॉटलंडने लोटांगण घातले. भारतीय गोलंदाजांनी स्कॉटलंडच्या फलंदाजांना अक्षरशा: मैदानावर नाचवले. कोणत्याही फलंदाजांला खंभीरपणे भारताच्या गोलंदाजीचा सामना करता आला नाही. त्यामुळे स्कॉटलंडने अवघ्या ८६ धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले.

सुरुवातील पासूनच भारताने आक्रमक गोलंदाजी केली. नाणेफेक जिंकत कर्णधार विराट कोहलीने स्कॉटलंडला फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. बुमराहने २ बळी घेतले. त्याने ३.४ षटकात अवघ्या १० रन दिल्या. मोहम्मद शमीने ३ बळी घेतले. त्याने आपल्या ३ षटकात १५ धावा दिल्या. रवींद्र जडेजाने देखिल ३ बळी घेतले. त्याने ४ षटक टाकले व त्यामध्ये १५ धावा दिल्या. याबरोबर अनुभवी रवीचंद्रन अश्विन याने ४ षटक टाकत २९ धावा दिल्या व १ बळी मिळवला. या चार गोलंदाजांनी स्कॉटलंड खेळपट्टीवर टिकू दिले नाही व अवघ्या ८५ धावांमध्ये स्कॉटलंडचा डाव गुंडाळला.

स्कॉटलंड कडून सलामीवीर जॉर्ज मुनुशी याने १९ चेंडूत २४ धावा केल्या. तर फलंदाज कलुम मॅकलिऑड याने २८ चेंडूत १६ तर लिस्क याने १२ चेंडूत २१ धावा केल्या. याशिवाय स्कॉटलंडच्या इतर फलंदाजांनी फक्त हजेरी लावण्याचे काम केले.

भारताचा संघ : India vs Scotland 

केएल राहूल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, महोम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमराह

स्कॉटलंडचा संघ 

जॉर्ज मुनुशी, केल कॉटझर, मॅथ्यु क्रॉस, रिची बॅरिंग्टन, कलुम मॅकलिऑड, माईकल लिस्क, ख्रिस ग्रिव्स, मार्क वॅट, सफैयान शरीफ, अल्सादीर इव्हन, ब्रॅड्‍ली व्हिल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT