New Zealand vs Namibia : न्यूझीलंडने नामिबियाचा केला ५२ धावांनी पराभव | पुढारी

New Zealand vs Namibia : न्यूझीलंडने नामिबियाचा केला ५२ धावांनी पराभव

शारजाह : पुढारी ऑनलाईन

टी२० वर्ल्ड कप ( T20 world Cup ) मधील साखळी सामन्यामधील ग्रुप २ गटातील न्यूझीलंड आणि नामिबिया New Zealand vs Namibia एकमेंकाशी आज भिडले. या सामान्यात न्यूझीलंडने नामिबियाचा ५२ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने नामिबिया समोर १६४ धावांचे आव्हान केला. नामिबियाने या आव्हानाचा पाठलाग करताना फारशी चमकदार कामगिरी करु शकला नाही. नामिबिया २० षटकात ७ बाद १११ धावाच करु शकला. नामिबियाला पराभूत करत न्यूझीलंडने हा सामना ५२ धावांनी जिंकत सेमीफायनल साठी भक्कम दावेदारी सांगितले आहे.

New Zealand vs Namibiaन्यूझीलंडच्या या भक्कम विजयाने भारताच्या अपेक्षांना सुरुंग लागू शकतो. आता भारताची संपूर्ण आशा ही अफगानिस्तानवर टिकून असेल. भारताला जर सेमीफायनलमध्ये पोहचायचे असेल तर अफगानिस्तानने न्यूझीलंडला पराभूत करावे लागेल. आजच्या विजयाने न्यूझीलंडने ग्रप २ च्या गटात दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. न्यूझीलंडने ४ पैकी ३ सामने जिंकत ६ गुण पटकावले आहेत. तसेच त्यांचा रनरेट प्लस १. २७७ इतका आहे.

न्यूझीलंडने १६४ धावांचा दिलेले आव्हान स्विकारात नामिबियाने चांगली सुरुवात केली. पण नंतर ठराविक अंतराने त्याचे खेळाडू बाद होत गेले त्यामुळे त्यांना आवश्यक धावगती राखता आली नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी नामिबियाच्या फलंदाजांवर चांगला दबाव निर्माण करुन ठेवला. जलदगती गोलंदाजांसह न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी देखिल आपला दबदबा कायम राखला. टीम साउथी याने २ , बोल्ट याने २ तर सँटनर, जीमी निशम आणि इश सोधी यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.

नामिबियाच्या स्टिफन बार्ड ( २२ चेंडूत २१ धावा), माईकल लिंगने (२५ चेंडूत २५), झेन ग्रीन (१७ चेंडूत १६ धावा) हे फलंदाज सोडता इतर कोणाला ही न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. इतर फलंदाजांनी केवळ मैदानावर हजेरी लावण्याचे काम केले. त्यामुळे नामिबियाने २० षटकात केवळ ७ बाद १११ धावा करु शकला.

दरम्यान, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना नामिबिया समोर १६४ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा मानला जात आहे. जर नामिबियाने न्यूझीलंडला मात दिली तर भारताला सेमीफायनल मध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. नामिबियाला हा सामना जिंकायचे असल्यास न्यूझीलंडचे १६४ धावांचे खडतर आव्हान पार करावे लागणार आहे.

New Zealand vs Namibia  नामिबियाने नाणेफेक जिंकत न्यूझीलंडला ( T20 world Cup ) प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. न्यूझीलंडच्या मध्यक्रमातील फलंदाज ग्लेन फिलिप्स आणि जीमी निशम यांच्या अंतिम षटकातील तडाकेबाज फलंदाजीमुळे न्यूझीलंड संघाने नामिबिया समोर १६४ धावांचे आव्हान ठेवले. न्यूझीलंडने निर्धारित २० षटकांच्या खेळीत ४ बाद १६३ धावा केल्या.

New Zealand vs Namibia  नामिबियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय सार्थ ठरवत संपूर्ण सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवले. त्यांना जलद गतीने धावा बनविण्याची फारशी संधी दिली नाही. तसेच ठरावीक अंतरामध्ये ते न्यूझीलंडचे फलंदाज बाद करत राहिले त्यामुळे न्यूझीलंडवर नामिबियाने दबाव कायम ठेवला होता. १७ व्या षटकापर्यंत न्यूझीलंडच्या फलंदाजांनी फक्त ११० धावा केल्या होत्या. अखेरच्या ३ षटकात ग्लेन फिलिप्स आणि जीमी निशम यांनी मोठे फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. शेवटच्या ३ षटकात न्यूझीलंड ५३ धावा केल्या त्यामुळे त्यांना नामिबियासमोर १६३ धावांचे आव्हान ठेवता आले.

न्यूझीलंड कडून खेळताना सलामीवीर मार्टिन गप्टील याने १८ चेंडूत १८ धावा केल्या. सलामीवीर मिशेल याने १५ चेंडूत १९ धावा करुन बाद झाला. तर कर्णधार केन विल्यमसन याने २५ चेंडूत २८ आणि कॉनवे याने १८ चेंडू १७ करुन बाद झाले. तर शेवटच्या षटकात तडाखेबाज खेळी करणाऱ्या ग्लेन फिलिप्स याने २१ चेंडूत ३९ तर जीमी निशम याने २३ चेंडूत ३५ धावांची फलंदाजी करत दोघेही नाबाद राहिले. या खेळीत फिलिप्स याने ३ षटकार आणि १ चौकार तर निशम याने २ षटकार आणि १ चौकाराची आतषबाजी केली.

Back to top button