पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वत: गर्भवती असल्याची माहिती नसलेल्या तरुणीने प्रवास करत असताना विमानात बाळाला जन्म दिला. गेल्या आठवड्यात ही घटना घडली. तरुणीला पोटदुखीचा त्रास होत असल्याने ती बाथरूममध्ये गेली. तिथेच तिने बाळाला जन्म दिला. (Birth On Plane)
डचमधून प्रवासाला सुरूवात केलेल्या तमारा ही इक्वीडॉरहून स्पेनला जाण्यासाठी प्रवास करत होती. विमान लँड करण्यापूर्वी तिला पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे ती बाथरुममध्ये गेली. (Birth On Plane) तेथे तिची प्रसूती झाली. तमाराला ती गरोदर आहे, याची कल्पना नव्हती. त्यामुळे ती या घटनेनंतर खूपच हैराण झाली होती, असे रूग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. सध्या तमारा आणि तिच्या बाळाची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती के.एल.एम एअरलाइनने सांगितले. शिफोल येथे आल्यानंतर तमारा आणि तिच्या बाळाला रूग्णवाहिकेतून नेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Birth On Plane)