पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस यांनी सदस्यांवर सोपवले आहे जबरा फॅन हे कार्य. (बिग बॉस मराठी 4- Day 17) स्टार परफॉर्मर तेजस्विनी आणि समृद्धी यांच्या ग्रुपमध्ये कार्यादरम्यान फॅन्सना मिळणार आहे कॅप्टन्सीची उमेदवारी. आता ती कोणाला मिळेल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. (बिग बॉस मराठी 4- Day 17)
कार्यादरम्यान घरामध्ये जोरदार राडे होणार आहेत. कालचा दिवस प्रसाद आणि योगेशच्या भांडणामुळे गाजला. आज घरामध्ये नक्की होणार कळेलच. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तेजस्विनी आणि अक्षय एकमेकांवर आरोप करताना दिसणार आहेत. तेजस्विनी अक्षयवर ओरडताना दिसणार आहे, तू मुलींकडे का गेला? ही कुठली भाषा आहे तुझी बोलायची? – अपूर्वा… आता अपूर्वा हे नक्की कोणाला बोलली ते आज कळेलच. तेजस्विनी, दुसऱ्या टीमला बोलताना दिसणार आहे, हे नुसते रडू बाई आहेत. या टास्कमध्ये अजून काय घडले कोणता ग्रुप विजेता ठरला ? कोणाला उमेदवारी मिळाली बघूया आजच्या भागामध्ये.