bbm 4 
Latest

Bigg Boss Marathi 4 : अक्षय केळकरने सांगितला ब्रेकअपचा किस्सा!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षय केळकरला नात्यातीलच कोणी एक मुलगी मेसेजेस पाठवत होती, जे त्याच्या आईच्या निदर्शनास आले आणि त्याचबद्दल अक्षयने सदस्यांना किस्सा सांगितला आहे. त्याने मेसेजेस इग्नोर केले पण आईने मात्र सांगितले की, मुलगी तुला मेसेजेस करत आहे, तुझ्यात इंटरेस्टेड असावी. नात्यातील होती म्हणून मी तिच्या घरी रहायला गेलो. त्यांच्यात झाली बरीच चर्चा. अक्षय म्हणाला छानचं होते ते क्षण, पण ब्रेकअप झाला आणि… माझ्या आयुष्यातलं पहिलं प्रेम आईनी जुळवून दिलं. एका इव्हेंटला गेलो असता मला सांगितलं काय सल्ला देशील तो म्हणाला, "मी सल्ला नाही देणार पण, माझे आई बाबा नववी नापास आहेत, रिक्षावाला घर सांभाळतो आहे. इतका फ्रिडम दिला दोन्ही मुलांना कि ते बरोबर मार्गावर चालत आहेत. शिक्षित राहून अशिक्षित राहण्यापेक्षा अशिक्षित राहून शिक्षित राहणं गरजेचे आहे.

यशश्री मसुरकर हिने देखील आपले अनुभव कथन केले. यशश्री मसुरकर म्हणाली-मला शाळेत जायला खूप आवडायचं. बिग बॉस मराठीच्या घरात यशश्री, किरण, योगेश, समृद्धी, विकास यांच्यात रंगल्या शाळेच्या गप्पागोष्टी आणि ते रमले आठवणींमध्ये. यशश्रीचे म्हणणे आहे – मी आज जे काही आहे ते माझ्या शिक्षकांमुळे. शाळेमध्ये मी ऑल राऊंडर होते. सगळं करायचे – न्यूज वाचायचे, प्रार्थना म्हणायचे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT