पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस-१७' सीजनच्या विजेत्याची घोषणा होण्याआधी अंकिता लोखंडे शोमधून बाहेर झाली. अंकिता लोखंडे सेटच्या बाहेर येताच प्रशंसकांनी तिला घेरलं. अंकिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. क्लिपमध्ये अंकिता खूप निराश दिसत आहे. ती मीडियाशी बोलण्यासही नकार देते.
संबंधित बातम्या –
एका व्हिडिओमध्ये अंकिता लोखंडे खूप चिंतेत दिसत आहे. ती आपल्या वॅनिटी व्हॅनमध्ये जात होती, तेव्हा मीडिया – प्रशंसकांनी तिला घेरलं. जेव्हा अभिनेत्री अंकिताची टीम गर्दी नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत होती, तेव्ही तिची आई तिच्या मागे चालताना दिसते. अंकिता म्हणताना दिसते की, 'आराम से'. अंकिता लोखंडेने यावेळी व्हाईट कलरच्या साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे १७ व्या सीझनमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिली होती.
अंकिता लोखंडेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिजन्स यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने प्रतिक्रिया दिली की, आता ती खरोखरंच दु:खी दिसत आहे.' दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, 'त्यांनी आपल्या परिवाराला प्राधान्य दिले आहे आणि ती मुलाखत देण्यास नकार देत आहे. असे करून तिने सर्वांची मने जिंकली आहेत. आणखी एकाने लिहिलं, 'अंकिता खरी विजेती आहे.' फिनालेमध्ये एलिमिनेशनसाठी तिचे नाव समोर येताच ती निराश झालेली दिसली. ती भावूक होतानाही दिसली. तिचे कुटुंबीय देखील निराश दिसत आहेत. तिच्या वहिनीच्या डोळ्यात देखील अश्रू तराळले होते.
video -viral bhayani, ishamalviyaa16 Instagram वरून साभार