चर्चेतील असणारा कार्यक्रम म्हणजे, बिग बॉस. यावर्षीचा बिग बॉसच्या १५ व्या सिझनची (Bigg Boss 15 Winner) विनर ठरली आहे तेजस्वी प्रकाश. फिनालेमध्ये तेजस्वी आणि प्रतीक या दोघांमध्ये स्पर्धा होती. दोघांपैकी कोण होणार बिग बॉसच्या १५ चा विजेता? याबद्दल सर्वांना उत्सूकता लागून राहीली होती. आणि टॉप तीनमधील करण कुंद्राआणि प्रतीक सहजपाल यांना टक्कर देत तेजस्वी प्रकाशने बाजी मारली. प्रतीक सहजपाल उपविजेता ठरला. तेजस्वीला बिग बॉस ट्रॉफीसह ४० लाख रुपये मिळाले आहेत. तसेच 'नागिन ६' या मालिकेत लीड रोल मिळाला आहे.
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश केमिस्ट्री
बिग बॉसच्या १५ व्या सीझनच्या प्रवासातील करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश या दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री चांगलीच चर्चेत होती. दोघांचाही फॅन वर्ग खूप आहे. या दोघांच रिलेशन असचं राहणार का याची चाहत्यांना उत्सूकता लागून राहिली आहे.
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश'नागिन ६' लीड रोल
बिग बॉसच्या १५ व्या फिनालेमध्ये एकता कपूरने छोट्या पडद्यावरील बहूचर्चित आणि लोकप्रिय मालिका 'नागिन ६' मध्ये लीड रोल कोण करणार आहे याबद्दल सांगितले. 'नागिन ६' मध्ये लीड रोलसाठी बिग बॉस १५ व्या सिझनची विजेती तेजस्वी प्रकाशला कास्ट करण्यात आले आहे.
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला ट्रिब्यूट
बिग बॉसच्या १५ व्या फिनालेमध्ये शहनाज गीलची या फिनालेमध्ये उपस्थिती होती. शहनाज आणि सिद्धार्थच्या काही आठवणी बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमध्ये दाखवून दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला ट्रिब्यूट दिला गेला. यावेळी सर्वच सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीने भावूक झाली.
'बिग बॉस 13' चा विजेता सिद्धार्थ शुक्लाBigg Boss 15 Winner कोण आहे तेजस्वी प्रकाश?
तेजस्वी प्रकाश बिग बॉस 15 ची विनर ठरल्यापासून चर्चेत आली आहे. तिला सोशल मीडियावर शूभेच्छांचा वर्षाव होत आहे; पण तुम्हाला हे माहित आहे का? तेजस्वी ही एक इंजिनियर आहे. तिला अभिनयाची आवड असल्याने आपली अभियंताची असलेली नोकरी सोडून ती अभिनय क्षेत्राकडे वळली. तेजस्वीने '2612' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने स्वरांगिनी, संस्कार, जोडे रिश्तों के सूर, 'पहरेदार पिया की' व 'सिलसिला बदलते रिश्तों का' या मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. तेजस्वीने अनेक रिॲलिटी शोमध्येही सहभागी झाली आहे. 'खतरों के खिलाड़ी 10', 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', 'कॉमिडी नाइट्स विद कपिल' व 'कॉमिडी नाइट्स बचाओ' या शोमध्ये आपली झलक दाखवली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.