मुंबई : पुढारी वृत्तसेवा : एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात शनिवारी (दि.२१) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणमध्ये चहापान झाले. (Maharashtra Politics)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ऐतिहासिक ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त एका संस्थेच्यावतीने शनिवारी प्रतिष्ठानच्या सभागृहात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात सकाळी शरद पवार यांनी सहभाग घेतला होता. आपले विचार मांडल्यानंतर ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या आपल्या कार्यालयात बसले होते. (Maharashtra Politics)
पवार यांच्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी या ग्रंथामागील बाबासाहेबांची भूमिका स्पष्ट केली. त्यांचे भाषण संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंबेडकर यांना पवार यांच्यासोबत चहापान घेण्याचे विनंती केली.
राजकीय चर्चा न करता या दोन्ही नेत्यांमध्ये सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याचे समजते.
हेही वाचा