पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय ) सचिव जय शहा यांनी ट्विटरच्या माध्यमातून आज ( दि. १६ )मोठी घोषणा केली. देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धांच्या बक्ष[स रकमेत वाढ करत असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.
जय शहा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, देशात खेळल्या जाणार्या क्रिकेट स्पर्धेतील बक्षीस रकमेत वाढ जाहीर करताना मला आनंद होत आहे. भारतीय क्रिकेटचा कणा असलेल्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू. रणजी विजेत्यांना या पुढे ५ कोटी रुपांचे बक्षीस दिले जाईल. यापूर्वीही रक्कम २ कोटी होती. तर वरिष्ठ महिला विजेत्यांना ५० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. यापूर्वी ही रक्कम केवळ ६ लाख रुपये इतकी होती. (BCCI)
हेही वाचा;