भंडारा; पुढारी वृत्तसेवा : सख्या भावानेच चारित्र्यावर संशय घेत लहान बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना भंडारा तालुक्यातील सोनूली येथे घडली आहे. बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत भावाने केलेल्या बेदम मारहाणीत बहिणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित आरोपी आशिष गोपीचंद बावनकुळे (वय २०) याला पोलिसांनी अटक केली आहे. (Bhandara Crime News)
मृत मुलीच्या मोठ्या भावाने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. यावरून तिचे भावासोबत शाब्दिक भांडण झाले. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. त्याने तिला प्रचंड मारहाण केली. या मारहाणीतच मुलीचा मृत्यू झाला. तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करून सशयित आरोपी आशिष बावनकुळे याला ताब्यात घेतले. गुन्ह्याचा तपस पोलीस निरीक्षक अभिजित पाटील व उपनिरीक्षक महेंद्र शहारे, पोलीस हवालदार विनायक बेदरकर करीत आहेत. (Bhandara Crime News)
हेही वाचा :