Latur Crime News : माणुसकीला काळीमा; सताळा येथे दारूसाठी पैसे न दिल्याने पोटच्या मुलाकडून आईचा खून | पुढारी

Latur Crime News : माणुसकीला काळीमा; सताळा येथे दारूसाठी पैसे न दिल्याने पोटच्या मुलाकडून आईचा खून

किनगाव, पुढारी वृत्तसेवा :  दारू पिण्यास पैसे न दिल्याने जन्मदात्या मुलाने आईच्या डोक्यात लोखंडी घुसा घालून खून केला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २२) रात्री सताळा खुर्द (ता. अहमदपूर)  येथे घडली. या घटनेने परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. Latur Crime News

याबाबत अधिक माहिती अशी की, सताळा येथील ज्ञानेश्वर नाथराव मुंडे (वय २३) याने संगीता नाथराव मुंडे (वय ४०) हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, आईने पैसे न दिल्याने उखळामध्ये कुटण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी घुसा तिच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. या तिचा मृत्यू झाला. Latur Crime News

फिर्यादी नाथराव त्र्यंबक मुंडे यांच्या फिर्यादीवरून मुलाविरोधात किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button