पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांचे झोपेचे गणित बिघडलेले आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खिळून राहायचे; मग झोपायचे आणि सकाळी उशिरा उठायचे असा क्रम अनेकांचा झाला आहे. पण, भारतातील ऋषीमुनींनी घालून दिलेल्या आचरणांचा अभ्यास केला उशिरा उठायचे तर हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. नियमित सकाळी सूर्योदयापूर्वी
( Brahma Muhurta) उठून आंघोळ करणे हे आरोग्यासाठी आणि आपल्या एकूण समृद्धीसाठी आवश्यक मानले गेले आहे.
पहाटे ३ ते ६ ही वेळ भारतीय परंपरेनुसार ब्रह्म मुह्रूर्त म्हटले आहे. ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठणे हे सौंदर्य, बल, विद्या, स्वास्थ्य यांच्यासाठी आवश्यक आहे. ब्रह्म मुर्हुतावेळी वायू मंडलात ऑक्सिजनचे प्रमाण सर्वांत जास्त असते. शुद्ध वायू मिळाल्याने मन आणि शरीर ताजेतवाने होते. सकाळी लवकर उठल्याने मेंदूतही सकारात्मक ऊर्जा कार्यरत राहाते.
प्राचीन ऋषींनी सूर्योदयापूर्वी उठने आणि आंघोळ करणे ही परंपरा सुरू केली होती. त्यामुळे आपले व्यक्तीमत्त्व तेजस्वी होते. सुखसमृद्धी वाढते आणि आरोग्य चांगले राहते. मानवी शरीराचे आरोग्य उत्तम राखणे हे हे परंपरचे मूळ आहे. उगवत्या सूर्याचा प्रकाश आणि चांगली हवा शरीराला मिळते, आणि यातून आपले आरोग्य चांगले राहाते.
हेही वाचा :