manjusha niyogi 
Latest

Manjusha Niyogi : सिनेसृष्टी हादरली! पल्लवी डे नंतर बिदिशा आणि आता आणखी एका अभिनेत्रीची आत्महत्या

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

सिनेमा जगतात सध्या दुर्देवी घटना पाहायला मिळताहेत. अभिनेत्री बिदिशा आणि पल्लवी डे च्या निधनाचे वृत्त ताजे असताना आता आणखी एक बंगाली अभिनेत्रीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी सकाळी २७ मे रोजी अभिनेत्री मॉडल मंजूषा नियोगीने (Manjusha Niyogi ) आत्महत्या केली. तिचा मृतदेह तिच्या फ्लॅटवर लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. (Manjusha Niyogi)

लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह

अभिनेत्री पल्लवी डे आणि मॉडल बिदिशा डेचं निधन झालं होतं. फॅन्सना हा मोठा धक्का होता. या धक्क्यातून सावरत नाही तोपर्यंत आणखी एका बंगाली अभिनेत्रीच्या मृत्यूचे वृत्त येऊन धडकले. शुक्रवार २७ मे च्या सकाळी अभिनेत्री मॉडल मंजूषा नियोगीचं निधन झालं.

अभिनेत्रीची आई म्हणाली-

मंजूषा नियोगीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी तिच्या फ्लॅट कोलकातामध्ये आढळला. याप्रकरणी पोलिस तपास करत आहे. पोलिसांनी मंजूषाच्या आईचे स्टेटमेंट दाखल केले आहे. मंजूषाची आई म्हणाली-"माझी मुलगी नेहमी म्हणायची की, तिला बिदिशासोबत राहायचे आहे. ती सातत्याने बिदिशा विषयी सांगायची. मी तिला ओरडलं. ती म्हणायची की, लवकरचं मीडिया बिदिशा प्रमाणे आमच्याकडे लक्ष द्यायची."तिनं सांगितली की, ती आपल्या मैत्रिणीच्या मृत्यूनंतर डिप्रेशनमध्ये होती.

मंजूषाच्या आधी 'या' अभिनेत्रीने केली होती आत्महत्या

मंजूषाची मैत्रीण बिदिशाने आत्महत्या केली होती. बिदिशाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता. रिपोर्ट्सनुसार, पोलिसांना बिदिशाची सुसाईड नोटदेखील मिळालीय. त्यानंतर पोलिसांनी कडक तपास सुरू केला आहे.

याआधी बंगाली अभिनेत्री पल्लवी डेचंदेखील निधन झालं होतं. तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला अवस्थेत माळाला होता. याआधी केरळची मॉडल सहानाने तिच्या वाढदिवसादिवशी आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह पोलिसांना खिडकीशी लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT