Latest

‘कवयित्री’ ममतादीदींना ‘साहित्‍य’ पुरस्‍कार!, प. बंगालमधील साहित्‍यिक भडकले

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांना पश्‍चिम बांगला अकादमीने उत्‍कृष्‍ट साहित्‍यासाठी पुरस्‍कार जाहीर केला. सरकारी कार्यक्रमात त्‍यांना हा पुरस्‍कार प्रदानही करण्‍यात आला. मात्र आता सरकारच्‍या या कृतीविरोधात अनेक साहित्‍यिक निषेध नोंदवत आहेत. या निषेधार्थ लेखक रत्‍न राशिद बंदोपाध्‍याय यांनी २०१९ मध्‍ये मिळालेला पुरस्‍कार परत केला आहे. तर साहित्‍य अकादमीचे जनरल कौन्‍सिलचे सदस्‍य आनंदीरंजन विश्‍वास यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा दिला आहे.

सोमवारी ( दि.९ )रवींद्रनाथ टागोर यांच्‍या १६१ व्‍या जयंतीनिमित्त पश्‍चिम बंगालचे शिक्षण मंत्री ब्रत्‍य बासू यांनी मुख्‍यमंत्री ममता बॅनजीं यांना 'कोबिता बितान' या कविता संग्रहासाठी पुरस्‍कार जाहीर केला. हा पुरस्‍कार साहित्‍य क्षेत्राशी निगडीत नसणार्‍यांना त्‍यांच्‍या लिखानाबद्‍दल दिला जाईल, अशी घोषणा त्‍यांनी केली. या निर्णयाविरोधात आता सोशल मीडियावरही जोरदार टीका होत आहे.

 लेखक रत्‍ना राशिद यांच्‍याकडून पुरस्‍कार परत

ममता बॅनर्जी यांना राज्‍य सरकारतर्फे साहित्‍य पुरस्‍कार देण्‍याच्‍या निर्णयावर राज्‍यातील नामवंत साहित्‍यिकांनी जाेरदार टीका केली आहे. रत्‍ना राशिद यांना २०१९ मध्‍ये त्‍यांना देण्‍यात आलेला आनंद शंकर रे मेमोरिअल पुरस्‍कार परत करण्‍याची घोषणा केली. त्‍यांनी पश्‍चिम बंगाल अकादमीला पत्र लिहीले आहे. पुरस्‍कारासाठी देण्‍यात आलेले मानपत्र आणि पुरस्‍कार लवकरच आपल्‍या कार्यालयात पाठविण्‍यात येईल, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांना साहित्‍याचा पुरस्‍कार देवून पश्‍चिम बंगाल अकादमीला एक चुकीचा पायंडा पाडत आहे. जे लेखक साहित्‍यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करतात त्‍यांचा हा अवमान आहे, असेही त्‍यांनी आपल्‍या पत्रात म्‍हटलं आहे.

आनंदीरंजन बिस्‍वास यांनी दिला पदाचा राजीनामा

आनंदीरंजन बिस्‍वास यांनी साहित्‍य अकादमी सदस्‍यपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र त्‍यांनी आपल्‍या पत्रात ममता बॅनर्जी यांच्‍या नावाचा उल्‍लेख केलेला नाही. पश्‍चिम बंगालचे शिक्षण मंत्री हेच पश्‍चिमबंग बांगला अकादमीचे अध्‍यक्ष आहेत.

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT