बेळगाव

बेळगाव : बिबट्या पकडण्यात अपयश आल्याने दोन्ही हत्ती शिमोग्‍याकडे रवाना

अमृता चौगुले

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : बिबट्या पकडण्यात अपयश आल्याने पथकासह दोन्ही हत्ती शिमोग्‍याकडे रवाना करण्यात आले आहेत. बिबट्‌या पकडण्यासाठी ही शोध मोहीम गेल्‍या 12 दिवसांपासून सुरू होती.

बिबट्याचे गेल्या 12 दिवसांमध्ये कोठेही दर्शन अथवा ठसे दिसले नाहीत. कॅमेऱ्यामध्येही दर्शन झाले नाही. यामुळे काल रात्रीपासून बिबट्याची शोधमोहीम थांबवण्यात आली. केवळ 10 ते 12 कर्मचारी येथे तैनात करण्यात आले होते. दरम्‍यान, आज दुपारी हत्ती दोन ट्रकमध्ये बसवून शिमोग्‍याकडे रवाना केले.

या दोन्ही हात्तीने आत्तापर्यंत चार बिबटे व तीन वाघ पकडले आहेत. जवळपास सहा-सात हत्तीही पकडण्यात आले होते. या ठिकाणी आम्हाला आमच्या पद्धतीने शोध मोहीम राबविण्यास देण्यात आली नाही. त्यामुळे बिबट्या सापडू शकले नाहीत. हत्ती आल्यामुळे केवळ एक दोन दिवसातच बिबट्या येथून स्थळ सोडून गेले. त्यामुळे सध्या तरी या परिसरात बिबट्या नाही. त्यामुळे लोकांनी घाबरण्याची गरज नाही, असे शोध मोहीम कर्मचा-यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT