संग्रहीत छायाचित्र 
बेळगाव

खानापूर तालुक्यात लोंढा परिसरात आज-उद्या वीज खंडित

Shambhuraj Pachindre

बेळगाव पुढारी वृत्तसेवा: दुरुस्ती कामामुळे शनिवार व रविवारी शहापूर भागात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. बेळगाव व खानापूर तालुक्यातील कांही गावात रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत वीजपुरवठा ठप्प होणार असल्याची माहिती हेस्कॉमने दिली आहे.

शहरात केएचबी कॉलेज परिसर, शहापूर गाडेमार्ग, बसवेश्वर सर्कल, आचार्य गल्ली, नवी गल्ली, नार्वेकर गल्ली, बिच्चू गल्ली, सराफ गल्ली, मारुतीनगर, हरिकाका कंपाऊंड, सुवर्ण सौध, साई कॉलनी, येडियुराप्पा मार्ग, हालगा रोड या भागात शनिवार व रविवार वीजपुरवठा ठप्प होणार आहे. बेळगाव तालुक्यातील हिडकल, कोंडूसकोप, हलगा, बस्तवाड, शिगमट्टी, कमकारट्टी, कोलिकोप बडेकोळ, मास्तमर्डी, शिंदोळी, मुतगा, श्रीराम कॉलनी, महालक्ष्मी नगर, साईनगर, भरतेश कॉलेज, शिंदोळी क्रॉस, निलजी क्रॉस या भागात रविवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित होणार नाही. चिकोडी भागात बेडकीहाळ कोगनोळी, कारदगा, यमगर्णी, जनवाड, पट्टणकुडी या गावात रविवारी वीजपुरवठा होणार नाही.

खानापूर तालुक्यात लोंढा भागातील मंग्यानकोप, केरवाड, बिडी कक्केरी, चुंचवाड, रामापूर, सुरापूर, गोल्याळी, भुरूणकी, करीकट्टी, गस्टोळी, शिवाजीनगर, हालझुंजवाड, मास्केनट्टी, हलसाल, पडलवाडी, अनगडी, रंगदोळी, कापोली, शिवठाण, शिंदोळी बी. के., शिंदोळी के. एच., गोसे बी. के.,गोसे के. एच., मडवाळ, घोटगाळी, देवराई, जांबेगाळी, निंजलकोंडल, सुळेगाळी, हत्तरवाड, मेरडा, कारजगी, बस्तवाड, कसमळगी, मुगळीहाळ, कर्तनबागेवाडी, भालके, अवरोळी, चिकदीनकोप, कुडचवाड, देमनकोप, वड्डेबैल, सुरापूर, केरवाड, चिकअंग्रोळी, कुणकीकोप, बेकवाड, बसरीकट्टी, झुंजवाड के. एच. गार्बे नहट्टी, सगरे, दोडबैल, चन्नेवाडी, भुतेवाडी, हलशी, गुंडपी, बिजगर्णी, बांबर्डा या भागात रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत वीजपुरवठा ठप्प होणार आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT