वासंती राजेंद्र पाटील Pudhari
बेळगाव

Nipani Woman Death | लग्नकार्याहून येताना स्पीड ब्रेकरवरून दुचाकी घसरल्याने कुर्लीतील महिलेचा मृत्यू; पती जखमी

कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी–हुपरी मार्गावरील कोल्हापूर ऑक्सिजन कारखान्यासमोर अपघात

पुढारी वृत्तसेवा

Kagal Hupri road Two-wheeler accident

निपाणी : नातेवाईकांचे लग्नकार्य आटोपून दुचाकीवरून घरी परतत असताना स्पीड ब्रेकरवर दुचाकी आदळल्याने मागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि.१४) दुपारी घडली. वासंती राजेंद्र पाटील (वय ४५, रा. खालची गल्ली, कुर्ली ता. निपाणी) असे मृत महिलेचे नाव असून त्यांचे पती राजेंद्र ईश्वर पाटील हे किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुर्ली येथील राजेंद्र पाटील हे पत्नी वासंती पाटील यांच्यासह शिरदवाड (ता. शिरोळ) येथे नातेवाईकांच्या लग्नसमारंभाला गेले होते. लग्नकार्य आटोपून दोघेही दुचाकीवरून जवाहर साखर कारखाना मार्गे कागल–लक्ष्मी टेकडी फाईव्ह स्टार एमआयडीसी रस्त्याने आपल्या गावी परतत होते.

दरम्यान, कागल महामार्गावरील लक्ष्मी टेकडी ते कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी–हुपरी मार्गावरील कोल्हापूर ऑक्सिजन कारखान्यासमोर असलेल्या स्पीड ब्रेकरवर त्यांची दुचाकी आली असता मागे बसलेल्या वासंती पाटील या जोरात खाली पडल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नातेवाईकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मयत वासंती पाटील यांच्या मृतदेहाचे हुपरी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा कुर्ली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत वासंती पाटील यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगी आणि लहान मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुर्ली गावावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT