Warkari Woman Death pudhari
बेळगाव

Warkari Woman Death: पांडुरंगाच्या भेटीची आस अधुरीच... येळळूरच्या पायी दिंडीतील वारकरी महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

Anirudha Sankpal

Warkari Woman Dies: धर्मराज गल्ली येळळूर येथील सौ. शालन प्रकाश सायनेकर वय 59 वर्षे, या सोमवार (ता. 13) रोजी येळळूर येथून निघालेल्या वैष्णव सदन आश्रम येळळूर ते पंढरपूर या पायी दिंडीतून चालत पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. सोमवारपासून गुरुवारपर्यंत त्या अगदी व्यवस्थित दिंडीमध्ये चालत होत्या. गुरुवारी रात्री दीड वाजता अचानक त्यांना त्रास झाल्यामुळे दिंडीतील संचालकांनी त्यांना पहिल्यांदा चिक्कोडी येथील के. एल. ई रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चिक्कोडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांनी उपचारांना दाद दिली नाही. अखेर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या अचानक जाण्यामुळे वारकरी भक्तामध्ये व येळळूर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूने पांडुरंगाच्या भेटीची आस मात्र अधुरीच राहिली आहे.

पहिल्यांदाच त्या या दिंडीतून चालत प्रवास करीत होत्या. अन् दिंडीतच त्यांना मृत्यूने गाठले. त्यामुळे त्यांना मोक्ष मिळाला अशीही वारकऱ्यातून चर्चा आहे. चिक्कोडी येथून त्यांचे पार्थिव आज सकाळीच येळळूर मध्ये त्यांच्या घरी आणण्यात आले आहे.

त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुली, एक विवाहित मुलगा, दिर, जावई व नातवंडे असा परिवार आहे. नवहिंद सोसायटीचे चेअरमन शिवाजी सायनेकर यांच्या त्या वहिनी होत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT