श्रीशैलहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, अपघातात एकसंबाच्या तिघांचा जागीच मृत्‍यू file photo
बेळगाव

श्रीशैलहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, अपघातात एकसंबाच्या तिघांचा जागीच मृत्‍यू

क्रुझर वाहन व केळीने भरलेल्या मिनी ट्रकमध्ये भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

Three residents of on the spot in an accident involving a vehicle carrying devotees returning from Srisailam.

चिकोडी : पुढारी वृत्तसेवा

क्रुझर वाहन व केळीने भरलेल्या मिनी ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात चिकोडी तालुक्यातील एकसंबा येथील तीन जण यात्रेकरू ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आंध्रप्रदेश राज्यातील मार्कपुरम जिल्ह्यातील जंगमगुंटला गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 544 वर सोमवार सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली.

अजित सातवर, अलका शिंदे, गौरव शहा सर्व रा. एकसंबा अशी अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी व्यक्तींची नावे आहेत. यातील चार जण गंभीर जखमी असून एकूण 14 जण प्रवास करीत होते. याबद्दल अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी हे सर्वजण एकसंबा येथून क्रुझरने श्रीशैलला दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना आंध्र प्रदेश मधील प्रकाशम जिल्ह्यातील मार्कपुरम नजीक केळीने भरलेल्या छोट्या ट्रकची आणि क्रुझरची भीषण धडक झाली.

या क्रुझर वाहनामध्ये एकूण 14 जण यात्रेकरू होते. यापैकी तीन जण जागीच ठार झाले. यातील काहीजण गंभीर जखमी तर इतरांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. या अपघातात क्रुझर वाहन पूर्णपणे चक्काचूर झाले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे पार्थिव शरीर शवविच्छेदनासाठी मार्कपुरम सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास आंध्रप्रदेश पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे एकसंबा शहरावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT