Fox Attacks : वडिलांसोबत खेळताना चिमुरड्यावर कोल्ह्याचा हल्ला, अडकूरजवळील घटना

14 महिन्यांच्या बाळावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Fox Attacks
Fox Attacks : वडिलांसोबत खेळताना चिमुरड्यावर कोल्ह्याचा हल्ला, अडकूरजवळील घटना file photo
Published on
Updated on

Fox Attacks Young Child While Playing with Father; Incident Near Adakur

चंदगड : पुढारी वृत्तसेवा

चंदगड-नेसरी मार्गावरील अडकूर जवळ रस्ते तयार करणाऱ्या मजुराच्या 14 महिन्यांच्या बाळावर सोमवारी (दि. 16) रात्री ९.३० वाजता पालाबाहेर वडिलांसोबत खेळत असताना कोल्ह्याने हल्ला केला. यावेळी शेजारी पालात असणाऱ्या अन्य काही जणांनी एकत्र येत कोल्ह्याला हूसकावून लावले. या घटनेत जखमी झालेल्या 14 महिन्यांच्या बाळावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Fox Attacks
Leopard attack : बिबट्यांचं करायचं काय?

प्रवीण अरुण चव्हाण ( वय 1 वर्ष, ३ महिने ) असे त्या बाळाचे नाव आहे. घटनास्थळी वनपाल ए. बी. पावसकर, पोलीस पाटील कल्लाप्पा गुरव, भारती जाधव यांनी रात्री भेट देऊन पंचनामा केला. तर चंदगडचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड यांनी सीपीआर रुग्णालयात सदर बाळाची पाहणी करून माहिती घेतली. त्यानंतर वन खात्याचे ड्रोन सोडून घटनास्थळी परिसरात अन्य कोणत्या प्राण्याचे दर्शन होते का, याची चाचपणी केली.

घटनास्थळी बिबट्याने वा तरसाने हल्ला केला अशी चर्चा होती, मात्र सदर हल्ला कोल्हाकडूनच झाला असून त्याचे ठसे आढळले असल्याची माहिती वनपाल कृष्णा डेळेकर यांनी दिली. अडकूरजवळ शिवशक्ती हायस्कूल जवळ राजेंद्र घोळसे यांच्या घरासमोर पाच कुटुंबीय पालात राहतात.

Fox Attacks
Leopard Attack | पोलादपूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

या ठिकाणी रात्री अरुण चव्हाण हे त्यांच्या बाळाला पालाबाहेर अंगावर घेऊन खेळवत होते. याचवेळी अचानक आलेल्या प्राण्याने हल्ला केला. यावेळी जवळ असणाऱ्या अन्य रस्ते मजुरांनीही लागलीच त्या प्राण्याचा पाठलाग केला, मात्र त्याचा थांगपत्ता लागला नाही.

तर मागील वर्षी याच दिवसांमध्ये बोंजुर्डी जवळील कलम या शेतात ऊसपिकात भांगलण करताना वंदना श्रीकांत आबिटकर व सोना श्रीकांत आबिटकर (दोघीही रा. अडकूर) यांच्यावर व विंझणे गावाजवळील बांदेसूर शेतात विष्णू रामू भेकणे ( रा. अडकूर) यांच्यावरही पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला चढवला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news