बेळगाव : जिल्हा रुग्णालयातील बेजबाबदारपणामुळे रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईंकाना त्रास सहन करावा लागला आहे. पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल झालेल्या तरुणाचे आतडे कापल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे त्या तरुणाला खासगी रुग्णालयात आले आहे.
पोटदुखीमुळे महेश मादार नामक युवक 20 जूनरोजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. तेव्हाच डॉक्टरांनी त्या तरुणावर शस्त्रक्रिया केली होती. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या पोटातील गाठ काढण्याऐवजी त्यांनी आतड्याची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर महेशला घरी पाठवण्यात आले. घरी गेल्यानंतर महेशला पुन्हा तीव्र पोटदुखी सुरू झाली.? ? त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पोटाचे स्कॅनिंग केल्यानंतर गाठ तशीच असून आतड्यावर शस्त्रक्रिया केल्याचे दिसून आले आहे.
या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांना धक्काच बसला आहे. चुकीच्या शस्त्रक्रियेबाबत बिम्स रुग्णालयाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही, असे उत्तर देण्यात आले.