Karnataka Politics pudhari photo
बेळगाव

Karnataka Politics: कर्नाटकच्या राजकारणात काहीतरी मोठं होणार... जारकीहोळींची 'डिनर डिप्लोमसी'त नेमकं काय ठरलं?

सतीश जारकीहोळी यांनी गुरूवारी रात्री बेळगावमध्ये आपल्या घरात मुख्यमंत्री सिद्धारमैय्या गटातील नेत्यांसाठी डिनर पार्टीचे आयोजन केलं होतं.

Anirudha Sankpal

Karnataka Politics DK Shivkumar Vs Siddaramaiah: कर्नाटक काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्ष सुरू आहे. सरकारमधील मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री गटात मुख्यमंत्री बदलावरून जोरदार राजकीय कवायती सुरू आहेत. दरम्यान, सिद्धारमैय्या अन् डी.के. शिवकुमार यांची नेतृत्वबदलावरून दिल्ली वारी देखील झाली. हायकमांडच्या निर्देशानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ब्रेकफास्ट डिप्लोमसी देखील रंगली.

बेळगावमध्ये पार्टीचं आयोजन

मात्र आता सिद्धारमैय्या यांच्या जवळचे समजले जाणारे सतीश जारकीहोळी यांनी गुरूवारी रात्री बेळगावमध्ये कुवेम्पू नगरमध्ये नगरमध्ये आपल्या घरात मुख्यमंत्री सिद्धारमैय्या गटातील नेत्यांसाठी डिनर पार्टीचे आयोजन केलं होतं.

या डिनर पार्टीला मुख्यमंत्री सिद्धारमैय्या, गृहमंत्री जी परमेश्वर, मंत्री एचसी महादेवप्पा, मंत्री जमीर अहमद खान आणि आमदार पोनन्ना यांच्यासह अजून दोन ते तीन आमदार सहभागी झाले होते. सिद्धारमैय्या आणि महादेवप्पा हे एकाच गाडीतून जारकीहोळी यांच्या घरी पोहचले होते.

नेतृत्व बदल झाला तर काय...

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जारकीहोळी यांच्या या डिनर डिप्लोमसीमध्ये नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना जर नेतृत्वबदल होण्याची चर्चा सुरू झाली तर तुम्ही सहजा सहजी मुख्यमंत्रीपद सोडू नका. मिळालेल्या माहितीनुसार जर सिद्धारमैय्यांना हटवले तर काँग्रेसच्या मागासवर्गीय वोटबँकला मोठा फटका बसू शकतो असा इशारा देण्यात आला आहे.

या डिनर डिप्लोमसीमध्ये नेत्यांनी जर नेतृत्वबदलाचा मुद्दा अधिकृतरित्या समोर आला तर मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या हायकमांडला याचे काय राजकीय परिणाम होऊ शकतात हे सांगितलं पाहिजे. जर सिद्धारमैय्या यांना पद सोडण्यास सांगितले तर दिल्लीत कोणत्या नेत्यांशी बोलायचं आहे आणि काय संदेश द्यायचा आहे याच्यावर देखील यावेळी चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे.

काय म्हणाले डी.के. शिवकुमार?

मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या नेत्यांना असे वाटते की नेतृत्वबदलाच्या या चर्चा सुरू असताना डिके शिवकुमार आणि सिद्धारमैय्या यांना लवकरच दिल्लीत बोलवलं जाईल.

दरम्यान, डिनर डिप्लोमसीबाबत उमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना प्रश्न विचारला असता तर त्यांनी त्यांना डिनर मिटिंग करू द्या मी आनंदी आहे. मला याचं का उत्तर द्यावं डिनरसाठी भेटणे याच काय गैर आहे?'

सिध्दारमैय्या स्पष्टच बोलले

ही डिनर डिप्लोमसी मुख्यमंत्री सिद्धारमैय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यामध्ये पॉवर शेअरिंगच्या अरेंजमेंटवरून सुरू असलेल्या सततच्या चर्चेनंतर होत आहे. कर्नाटक सरकार स्थापन होत होतं त्यावेळी काँग्रेस लीडरशिपचा एक फॉर्म्युला ठरला होता.

मात्र आता सिद्धारमैय्या यांनी असा कोणताही फॉर्म्युला ठरला नव्हता. हायकमांडने मला पाठिंबा दिला होता असं वक्तव्य करून खळबळ निर्माण केली आहे. आता यावर डीके शिवकुमार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT