बेळगाव

निपाणी: पुणे- बंगळूर महामार्गावर ट्रकला गळफास घेऊन चालकाने जीवन संपवले

अविनाश सुतार

निपाणी: पुढारी वृत्तसेवा: चालकाने ट्रकलाच गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर लकडी पुलाजवळ आज (दि.२४) उघडकीस आली. दत्तात्रय नानासो साळुंखे (वय 28, रा. मसूरकवठे ता. कराड, जि.सातारा) असे मृत ट्रक चालकाचे नाव आहे. या घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे.

दत्तात्रय साळुंखे हा चालक ट्रकमधून मुंबई येथून बंगलोरकडे प्लायवूड भरून जात होता. दरम्यान त्याचा ट्रक लकडी पुळाजवळील गजानन पेट्रोल पंपासमोर आला असता दत्तात्रय याने रस्त्याच्या बाजूला ट्रक उभा करून ट्रकलाच पूर्वेकडील बाजूस दोरी बांधून गळफास घेतला.

दरम्यान, ही घटना शेतवडीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आली. याची माहिती रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकाला देण्यात आली. त्यानुसार घटनास्थळी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे यांनी भेट देऊन पोलिसांना पाचारण केले. शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमादेवी हवालदार, बसवराज नेरली यांनी घटनास्थळी पाहणी करून ट्रकमधील कागदपत्राच्या आधारे मृत दत्तात्रय यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. सायंकाळी नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख पटवली.

शुक्रवारी मध्यरात्री दत्तात्रय याने मोबाईलवरून पत्नीशी मी जीवन संपवणार आहे, असे संभाषण केले होते. त्यामुळे या मागचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक माळगे यांनी फिर्याद दिली आहे. दत्तात्रय याच्या पक्षात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, बहीण असा परिवार आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT