अशा प्रकारे उंच डोंगरदर्‍यातून लोखंडी पूल उभारून लोहमार्ग साकारला आहे.  (Pudhari File Photo)
बेळगाव

Mizoram Railway Connectivity | 78 वर्षानंतर मिझोराम लोहमार्गाने जोडणार

मिझोराम राज्यातील भैरबी आणि सैरंग दरम्यानच्या दुर्गम डोंगराळ प्रदेश, खोल दर्‍या आणि दर्‍यांनी भरलेल्या ईशान्य राज्यात रेल्वे मार्गाची अंमलबजावणी करणे हे एक धाडसी साहस आहे.

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर, मिझोराम राज्य लोहमार्गाने जोडण्यात येणार आहे. 29 नोव्हेंबर 2014 पासून सुमारे 52 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग साकारण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आले होते. तब्बल अकरा वर्षानंतर हा लोहमार्ग पूर्ण झाला असून शनिवारी (दि. 13) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

मिझोराम राज्यातील भैरबी आणि सैरंग दरम्यानच्या दुर्गम डोंगराळ प्रदेश, खोल दर्‍या आणि दर्‍यांनी भरलेल्या ईशान्य राज्यात रेल्वे मार्गाची अंमलबजावणी करणे हे एक धाडसी साहस आहे. रस्ते मार्गाने मिझोराम ला जाण्यासाठी 7 तासांचा रस्ता प्रवास आता ट्रेनने फक्त 3 तासांचा झाला आहे. स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर आता पहिल्यांदाच रेल्वे मार्गाने हे राज्य भारताला जोडले जाणार आहे.

आसामला लागून असलेल्या या राज्यात मिझोरामच्या सीमेपर्यंत लोहमार्ग पोहोचला होता. परंतु राज्यात अद्याप लोहमार्गाचे जाळे पसरले नव्हते. 13 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मिझोराम ला जाणार्‍या पहिल्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील.

2014 मध्ये हा लोहमार्ग साकारताना 290 लोकांचा मृत्यू झाला होता. मिझोराम राज्याने भैरवी ते सैरांगपर्यंत नवीन रेल्वे मार्गाचे बांधकाम पूर्ण केले. 21 मार्च 2016 रोजी आसाम ते भैरबी पर्यंतच्या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून पहिली मालगाडी आसाममधील एरोना ते भैरबी पर्यंत पोचली. हा लोहमार्ग साकारताना वर्षातून फक्त चार महिने काम शक्य होते.

रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी लागणारी सामग्रीत वाळू, दगड, सिमेंट, लोखंड काश्मीर, पश्चिम बंगाल, मेघालय आणि इतर राज्यांमधून आणावे लागले. त्याबरोबर कामगारांना देखील परराज्यातून आणावे लागले होते. सर्व अडचणी अडचणीवर मात करत सुसज्ज लोहमार्ग उभारण्यात आला आहे.

भैरबी-सैरांग रेल्वे मार्ग घनदाट जंगले, खडकाळ टेकड्यामधून जातो, ज्यामध्ये 48 बोगदे आहेत. काही बोगद्यांमध्ये ईशान्य संस्कृती चित्रित केलेली आहे. 45 बोगद्यांची एकूण लांबी 13,855 मीटर आहे.

योजनेचा फायदा काय?

मिझोरामची राजधानी ऐज्वल मुख्य आकर्षण आहे. या ठिकाणी डोंगरावर घरांचा ढीगच अर्जुन ठेवल्यासारखी रचना बांधकाम केल्याने झाली आहे. हस्तकला, लाकूड आणि वन उत्पादने हे मुख्य आकर्षण आहेत. या राज्यातील लोक मात्र 91 टक्के साक्षर आहेत. मात्र परिस्थितीमुळे गरिबी आहे. शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रात अजूनही राज्य मागासलेले आहे. लोहमार्गाने हे राज्य भारताला जोडले जाणार असल्याने स्थानिक उत्पादनांच्या मागणीत वाढ होण्याबरोबरच, शिक्षण, व्यापार क्षेत्रे वाढीस लागतील.

रेल्वे लाईनची लांबी : 52 किलोमीटर

लहान-मोठे पूल : 142

एकूण बोगदे : 48

एकूण खर्च : 8,070 कोटी

एकूण प्रकल्प कालावधी: 11वर्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT