बेळगाव

अग्निशमनच्या तत्परतेमुळे वाचले अनेकांचे प्राण,टळली जिवितहानी

अमृता चौगुले

निपाणी :पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट उतारावर हॉटेल अमर नजीक बुधवारी सायंकाळी ट्रकचा अपघात झाला हाेता. या अपघातातानंतर अपघातग्रस्त ट्रॅकची डिझेल टाकी फुटून काही प्रमाणात ट्रकला आग लागली. दरम्यान या अपघातात चालक प्रदीप सुब्रमण्यम याचा जागीच मृत्यू झाला तर क्लीनर रंगनाथन एस हा गंभीर जखमी झाला.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने निपाणी अग्निशामनने धाव घेऊन दोन्ही बाजूंनी होणारी वाहतूक रोखून दरीत तीन तास रेस्क्यू ऑपरेशन करीत होणारी जीवित व वित्त हानी टळली. सदर अपघातग्रस्त ट्रकमधून स्टील पाईप भरून मयत चालक प्रदीप हा तामिळनाडू येथून मुंबईकडे जात होता.

दरम्यान डिझेल टाकी फुटल्याने महामार्गावर डिझेल मोठ्या प्रमाणात वाहत होते.शिवाय अपघातग्रस्त ट्रकला काही प्रमाणात आग लागली होती.त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन निपाणी अग्निशामक विभागाचे कर्मचारी ए. बी. मुला,डी.एस.कोरी,एन.हुद्दार,व्ही.एस.देवर्षी,के.एम.कुरी,एस.एस.कट्टी यांनी घटनास्थळी बंबासह धाव घेऊन आवश्यक ती खबरदारी घेत,सुमारे तीन तास रेस्क्यू ऑपरेशन करून जखमीला रुग्णालयात पाठवून अपघातग्रस्त वाहन बाजूला केले.

या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला. वेळीच अग्निशमन दल घटनास्थळी पोचल्यामुळे महामार्गावरून ये- जा करणाऱ्या इतर वाहनांचे आर्थिक नुकसान टळले, तर होणारी जीवित व वित हानी टळल्याने अग्निशामक दलाचे पोलीस प्रशासनाने कौतुक केले. या कामासाठी रस्ते देखभाल औताडे कंपनीच्या भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनीही मोठे अथक प्रयत्न केले. घटनास्थळी सीपीआय बी.एस.तळवार यांच्यासह अग्निशामक विभागाचे जिल्हा निरीक्षक शशीधर निलगार यांनी भेट देऊन पाहणी करून वेळेत रेस्क्यू ऑपरेशन राबवित सुमारे तीन तास खोळंबलेली दोन्ही बाजूने होणारी वाहतूक सुरळीत करून दिली.जर का वेळेत अग्निशामक दल पोचले नसते तर मोठ्या प्रमाणात वित्त व जीवित हानी झाली असती.

.हेही वाचा 

SCROLL FOR NEXT