म. ए. समितीचे नेते निंगोजीराव हुद्दार यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले.  Pudhari News Network
बेळगाव

म. ए. समितीचे नेते निंगोजीराव हुद्दार यांचे निधन

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : हदिंगनूर (ता. बेळगाव) येथील रहिवासी व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष निंगोजीराव इराप्पा हुद्दार (वय ८३) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि. १७) सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (दि. १८) सकाळी आठ वाजता होणार आहे.

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे हदिंगनूर येथील बहिर्जी शिरोळकर महाविद्यालय व सरस्वती हायस्कूलच्या बांधकाम व सुधारणा कमिटीचे ते संस्थापक अध्यक्ष होते. भारतीय सैन्य दलाचे निवृत्त सैनिक मारुती हुद्दार व प्रगतशील शेतकरी युवराज हुद्दार यांचे ते वडील होत.

त्यांनी बालवयापासून सीमाप्रश्नाच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. सीमाप्रश्नाबाबत आंदोलन केल्याने त्यांनी कारावासही भोगला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT