बंगळूर : कृष्णा नदीच्या पाणी वाटपासाठी स्थापन केलेल्या प्राधिकरणाचा निकाल अधिसूचनेद्वारे जाहीर करण्याच्या तयारीत असलेल्या केंद्र सरकारने आता या या मुद्द्यावर एकमत होण्यासाठी सर्व राज्यांची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीची तारीख लवकरच निश्चित केली जाईल आणि माहिती दिली जाईल. केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.
कृष्णा नदी खोर्यातील प्रलंबित प्रकल्प, कालव्यांचे आधुनिकीकरण, बांधकाम आणि भूसंपादन प्रक्रिया यावर चर्चा करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील सर्व आमदार, शेतकरी नेते आणि मंत्र्यांची बैठक बुधवारी (दि. 3) बंगळुरात झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, प्रलंबित कामे सुरू करण्यात येतील. जमीन संपादित करण्यासाठी द्यावयाच्या भरपाई रकमेवरून वाद आहे. राज्य सरकार परस्पर वाटाघाटीद्वारे हे सोडविण्यासाठी पावले उचलत आहे. बेळगावमध्येच यासंदर्भात शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता सर्व पक्षांचे आमदार, मंत्री आणि शेतकर्यांशी भेटून एकमत होण्याचा प्रयत्न करत आहोत. गुरुवारी (दि. 4) होणार्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने बागायती जमिनीसाठी प्रति एकर 24 लाख रुपये आणि कोरडवाहू जमिनीसाठी 20 लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शेतकर्यांनी ही भरपाई रक्कम घेण्यास नकार दिला. मंत्री आर. बी. थिम्मापूर यांनी निदर्शने करणार्या शेतकर्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारने त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट अद्याप गाठले गेले नाही. बराच वेळ वाया गेला आहे. प्रकल्पाचा खर्चही वाढला आहे. आम्ही सर्व काही शेतकर्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. शेतकर्यांच्या हितासाठी, आम्ही या प्रकरणात समन्वय साधू आणि त्यांच्या संमतीने जमीन संपादित करु, त्यानंतर प्रकल्प वेळेच्या आत पूर्ण केला जाईल, असेही सांगितले.
शेतकर्यांच्या जमिनीच्या भरपाईच्या मुद्द्यावरून मंत्री थिम्मापूर व उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यात जोरदार वादावादी झाली. शेतकर्यांसमोरच उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी मंत्री थिम्मापूर यांच्यावर टीका केली. मी शेतकर्यांच्या वतीने बोलत आहे. विभागप्रमुख म्हणून तुम्हाला वाटेल तो निर्णय तुम्ही घेऊ शकता, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
ऑगस्टच्या दुसर्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रातील पश्चिम घाटात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. जीवितहानी टाळण्यासाठी, कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने पूर हंगामात अलमट्टी जलाशयात 519.60 ऐवजी फक्त 517 मीटरपर्यंत पाणी साठवण्यास सहमती दर्शविली आहे. यातच दरवर्षीप्रमाणे परंपरागत गंगा पूजनाचा कार्यक्रम सहसा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केला जातो. त्यामुळे, शनिवारी हा कार्यक्रम होणार आहे. सध्या जलाशयात 519.55 मीटरपर्यंत पाणी असून 122.282 टीएमसी पाणीसाठा आहे.