बेळगाव

कर्नाटकात महिलांसाठी मोफत बस सेवेला आजपासून सुरूवात

निलेश पोतदार

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा कर्नाटकामध्ये आज (रविवार) पासुन शक्ती योजनेअंतर्गत महिलांसाठी मोफत बस प्रवासाचा शुभारंभ पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते झाला. बेळगाव मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या मुख्य बस स्थानकामध्ये या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार असिफ सेट होते.

सतीश जारकीहोळी आपल्या भाषणात म्हणाले, कर्नाटक राज्यामध्ये बहुचर्चित असलेली योजना म्हणजे शक्ती योजना. या योजनेअंतर्गत महिलांकरिता संपूर्ण राज्यात मोफत बस प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. विरोधकांनी आमच्यावरती शिंतोडे उडवले, मात्र आम्ही बोलल्याप्रमाणे करून दाखवले आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात महिलांकरिता मोफत बस प्रवास योजनेचा शुभारंभ तोट्यात असे बोलले जात असले तरी, परिवहन मंडळाच्या महसुलात आपसूकच वाढ होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार प्रकाश हुक्केरी जिल्हाधिकारी नितेश पाटील परिवहन नियंत्रक अधिकारी गणेश राठोड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT