काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली  ani x
बेळगाव

Karnataka CM new schemes | मुख्यमंत्री झाल्यानंतर डी. के. शिवकुमार यांच्या ६ बंपर घोषणा : विद्यार्थ्यांना मोफत बस पास

इतर शहरांत जाऊन शिक्षण घेणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे

पुढारी वृत्तसेवा

Top 6 big announcements made by DK Shivakumar after taking oath as CM

चिकोडी : डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून, त्यात विद्यार्थ्यांना मोफत बस पाससह एकूण सहा महत्त्वाच्या घोषणांचा समावेश आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत बस पास, रोजगाराच्या समस्यांचे निवारण, रस्ते बांधकामासाठी २,००० कोटी रुपयांची तरतूद आणि २,५०० चौरस फुटांपर्यंतच्या इमारतींसाठी अर्ज करणाऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

याशिवाय, केवळ बेंगळुरूपुरती मर्यादित असलेली 'बी-खाता' ते 'ए-खाता' योजना राज्यभर लागू करण्याची घोषणाही डी. के. शिवकुमार यांनी केली आहे. राज्यातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्याचे जाहीर करण्यात आले आहे, ज्याचा फायदा इतर शहरांत जाऊन शिक्षण घेणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना होणार आहे.

डी. के. शिवकुमार यांच्या पहिल्या ६ प्रमुख घोषणा:

  • शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत बस पास: विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास सुलभ व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • रस्ते बांधकामासाठी २,००० कोटी रुपयांची घोषणा: राज्यातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे.

  • २,५०० चौरस फुटांपर्यंत ओसी (OC) मधून सवलत: २,५०० चौरस फूट क्षेत्राच्या इमारतींसाठी अर्ज करणाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.

  • प्रत्येक पंचायतीमध्ये 'भारत जोडो युवक संघा'ची स्थापना: यासाठी १० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

  • खाजगी रोजगार विनिमय केंद्राची (Private Employment Exchange Centre) स्थापना: खाजगी क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

  • 'बी-खाता' ते 'ए-खाता' योजना राज्यभर विस्तार: केवळ बेंगळुरूपुरती मर्यादित असलेली ही योजना आता संपूर्ण राज्यात लागू केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT