बेळगाव

बेळगाव: टीईटी परीक्षेमुळे निपाणी परिसरातील खंडित वीजपुरवठ्याचा निर्णय मागे

अविनाश सुतार

निपाणी: पुढारी वृत्तसेवा : निपाणी, जत्राट व बेनाडी सबस्टेशन केंद्रांतर्गत गावातील वीजपुरवठा हेस्कॉमकडून रविवारी (दि.3) सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत खंडित करण्यात येणार होता. दरम्यान, टीईटी परीक्षेमुळे हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे दिवसभर वीजपुरवठा सुरळीत राहील, अशी माहिती हेस्कॉमचे मुख्य अभियंता अक्षय चौगुला यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

वीजपुरवठा केंद्रातील तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम चालणार होते. त्यामुळे हेस्कॉमला वेळेत वीजपुरवठा खंडित करावा लागणार होता. यासाठी उद्योजक, व्यावसायिक व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन चौगुला यांनी केले होते.

दरम्यान, जिल्हा शिक्षण विभागाने रविवारी (दि.३) टीईटी परीक्षा होणार असल्याने खंडित वीज पुरवठ्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी हेस्कॉमकडे केली होती. अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. रविवारी दिवसभर निपाणी शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत राहणार आहे, असे हेस्कॉमने पत्रकाद्वारे कळविले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT