बेळगाव

बेळगाव : मध्यवर्ती समितीकडून प्रा. भारती पाटील यांचा सत्कार

अविनाश सुतार

बेळगाव: पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील मानव्यविभाग, राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख तसेच महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नात प्रा. भारती पाटील यांचा मध्यवर्ती समिती कडून सत्कार करण्यात आला.

आज (दि. ६) शिवाजी विद्यापीठाकडून भारती पाटील यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बेळगावातून मध्यवर्ती समितीकडून उपस्थिती दर्शवून त्यांचा सत्कार करण्यात आला. सीमाभागातील मराठी विद्यार्थ्यांकरिता नुकताच आणलेल्या योजनेंतर्गत प्रवेशप्रक्रियेसंदर्भातील त्यांची मराठी विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांनी अग्रेसर भूमिका घेतली होती. त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. आनंद मेनसे, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT