बेळगाव : अनगोळ येथील चौथ्या रेल्वे फाटकाजवळ भुयारी मार्गाचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे येथील फाटक वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून येथील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. शुक्रवारी पोलिसांनी येथील रस्त्यावर खोदाई करून फलक लावला. चौथ्या रेल्वे फाटकाजवळील अंडरब्रीजच्या कामाला 20 जूनपासून प्रारंभ झाला.
हे काम पुढील वर्षभर म्हणजे 19 जून 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या रस्त्याची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आल्याचे पत्रक पोलिस आयुक्तांनी याआधीच प्रसिद्धीस दिले आहे. शुक्रवारी हा मार्ग बंद करत येथे फलक लावला.
अनगोळहून बेम्कोकडे जाणार्या वाहनधारकांना डीव्हीएस चौकाकडून हरीमंदिर रोड, अनगोळ नाका, तिसर्या रेल्वे फाटकावरील ओव्हरब्रीजवरून सोडले जाणार आहे. खानापूरहून बेम्कोकडे जाणार्या वाहनांना चौथे रेल्वे फाटकमार्गे अनगोळ, बेम्को सर्कलपासून तिसर्या रेल्वे फाटकापासून सोडले जाणार आहे.