बेळगाव : कॅन्टरचा धक्का लागल्याने रस्त्यावर पडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मंगळवारी (दि. 24) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काकतीजवळ हा अपघात झाला. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, महामार्गावरुन दुचाकीस्वार बेळगावहून संकेश्वरकडे निघाला होता. यावेळी सिलिंडर भरलेला कॅन्टरही याच दिशेने निघाला होता.
बहुदा दुचाकीस्वार बाजूला होत असताना मागून जाणार्या कॅन्टरची जोराची धडक बसली. यामध्ये रस्त्यावर पडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करुन घेणे सुरु होते.
त्यामुळे, मृताचे नाव व गाव समजू शकले नाही. काकतीचे पोलिस उपनिरीक्षक मंजुनाथ नायक यांच्याकडून पुढील तपास सुरु आहे.