Crime News File Photo
बेळगाव

Crime News: प्रेमात धोका! ‘घरी कोणी नाही’ सांगून प्रेयसीने भेटायला बोलावलं अन् विष पाजलं; प्रियकराचा मृत्यू

प्रेमसंबंधातून घडलेल्या धक्कादायक घटनेत उत्तर कन्नड जिल्ह्यातील जगलबेट येथील ज्ञानेश्वर गोविंद नाळकर (वय १७) या तरूणाचा विषारी पदार्थ पाजल्याने मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Crime News

बेळगाव : प्रेमसंबंधातून घडलेल्या धक्कादायक घटनेत उत्तर कन्नड जिल्ह्यातील जगलबेट येथील ज्ञानेश्वर गोविंद नाळकर (वय १७) या तरूणाचा विषारी पदार्थ पाजल्याने मृत्यू झाला. प्रेयसीनेच त्याला घरी बोलावून ‘टॉनिक’ असल्याचे सांगत विषारी पदार्थ पाजल्याचा आरोप ज्ञानेश्वरच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वरचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. २५ ऑगस्ट रोजी संबंधित मुलीने घरात कोणी नसल्याचे सांगून ज्ञानेश्वरला घरी बोलावून घेतले. यावेळी ‘हे टॉनिक घे’ असे सांगत तिने त्याला विष पाजल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानंतर काही वेळातच ज्ञानेश्वरला उलट्या होऊ लागल्याने त्याला जगलबेट येथे प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले.

प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारांसाठी त्याला बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांनी त्याला घरी नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ज्ञानेश्वरला जगलबेट येथे घरी आणण्यात आले.

दरम्यान, शुक्रवारी (दि. ११) पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी ज्ञानेश्वरच्या कुटुंबीयांनी संबंधित मुलीविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT