खादी भांडारमधून १००० ध्वजांची विक्रीF File Photo
बेळगाव

खादी भांडारमधून १००० ध्वजांची विक्री

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर निपाणीत खरेदीला प्रतिसाद; नागरिकांत उत्साह

पुढारी वृत्तसेवा

1000 flags were sold from the Khadi store

निपाणी : पुढारी वृत्तसेवा

येथील खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या दुकानातून दोन दिवसांत तब्बल १००० ध्वजांची विक्री झाली असल्याची माहिती येथील खादी ग्रामोद्योग विक्री केंद्राचे व्यवस्थापक श्रीकांत पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनी चांगला प्रतिसाद मिळात आहे. यात अनेकांनी यापूर्वी खरेदी केलेले तिरंगी ध्वज जपून ठेवले आहेत. त्यामुळे यंदाही ध्वज खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिकांनी हर घर तिरंगा हा उपक्रम राबवून देश प्रेम जागृत ठेवले आहे.

खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या विक्री केंद्र (दुकानात) शासकीय कार्यालये, संघ, संघटनांनी ध्वजाची नोंदणी केली होती. त्यानुसार गेल्या दोन दिवसांमध्ये विविध आकारातील तब्बल १००० ध्वजांची विक्री झाली आहे. यातून खादी ग्रामोद्योग महामंडळाला ३ लाख रुपयांचा महसूल मिळाला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

विविध आकारामध्ये कर्नाटक खादी ग्रामोद्योग फेडरेशन संघाने ठरवून दिलेल्या दरानुसार विक्री झाली आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास १५ हजार ध्वजांची विक्री झाली आहे. विशेष करून खादी ग्रामोद्योग महामंडळाच्यावतीने वितरित होणाऱ्या ध्वजालाच प्रतिसाद मिळत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

ग्राहकांच्या मागणीनुसार यंदा बेळगाव जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाच्या वतीने गरग, हुबळी व चित्रदुर्ग येथून जिल्ह्यातील १६ शाखाद्वारे ध्वजाची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये निपाणी येथील खादी ग्रामोद्योग विक्री केंद्रामधून ध्वज खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून विविध आकारातील ध्वजांचा पुरवठा ग्राहकांसाठी करून दिला आहे. याशिवाय शाल, हँडचेन याचीही उपलब्धता ग्राहकांसाठी केली आहे. दरम्यान उद्या २६ जानेवारीपासून पुढील ५४ खादी वस्तू खरेदीवर ३५ टक्के डिस्काऊंट ग्राहकांसाठी दिला जाणार आहे.
श्रीकांत पाटील, व्यवस्थापक, खादी ग्रामोद्योग, विक्री केंद्र निपाणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT