पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानी आणि बांग्लादेशच्या चाहत्यांकडून बीसीसीआयवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. आयसीसी बीसीसीआयच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप या चाहत्यांनी केला आहे. दरम्यान या आरोपांना बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भारताने बांग्लादेशचा पराभव केल्यानंतरही बांग्लादेशच्या चाहत्यांनी पंचांवरही गंभीर आरोप केले होते. बीसीसीआयच्या दबावामुळे पंचांनी ओल्या मैदानावर सामना सुरू करण्यास सांगितला, असा आरोप बांग्लादेशचे चाहते करत आहेत. यावरही रॉजर बिन्नी उत्तर दिले आहे. (BCCI Answer To Pak)
बांग्लादेश आणि पाकिस्तानच्या चाहत्यांना प्रत्युत्तर देताना रॉजर बिन्नी म्हणाले, "आयसीसी कोणत्याही संघाच्या बाजूने निर्णय देत नाही. त्यांच्याकडून सर्व संघाबरोबर समान व्यवहार करण्यात येतो. मला नाही वाटत की, आयसीसी कोणत्या संघाच्या बाजूने आहे. भारत हा क्रिकेटचे पावरहाऊस आहे. मात्र, आम्ही सर्वांसोबत समान व्यवहार करतो" (BCCI Answer To Pak)
भारतीय संघ २०२३ मध्ये आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार का? असा सवाल रॉजर बिन्नी यांनी विचारण्यात आला होता. यावर रॉजर बिन्नी म्हणाले, पाकिस्तानच्या दौऱ्याबाबत निर्णय घेणे हे बीसीसीआयच्या हातात नाही. हा निर्णय घेण्याचा अधिकार भारत सरकारला आहे. सरकारकडून पाकिस्तान दौऱ्यासाठी परवानगी दिली तर हे शक्य आहे. याबाबत केंद्रीय खेळ मंत्री अनुराग ठाकूर यांनीही आपले मत व्यक्त केले होते. भारतीय संघाला पाकिस्तानचा दौरा करण्यासाठी गृह मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे अनुराग ठाकूर म्हणाले होते. (BCCI Answer To Pak)